गोवा खबर

519 किलो पनीरसह दही, फ्राईज ओनियन जप्त

Published

on

Spread the love

गोवा खबर:अन्न आणि औषध प्रशासनाने म्हापशातील नव्या आंतरराज्य बसस्थानक परिसरात छापा मारून तब्बल 510 किलो पनीर तसेच खाद्यातील इतर साहित्य मिळून दीड लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.



मंगळवारी प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, निरीक्षक राजाराम पाटील, सोनल गोवेकर, प्रीमत परब यांनी ही कारवाई केली. मंगळवारी पहाटे ६ वाजल्यापासून प्रशासनाचे अधिकारी बसस्थानकावर पाळत ठेवून होते. या छाप्यात पनीरव्यतिरिक्त दही तसेच ६० किलो फ्राईज ओनियन जप्त करण्यात आले आहेत.

खाद्यपदार्थांची असुरक्षितपणे वाहतूक करण्यात आली होती. काही पदार्थांवर माहिती देणारे लेबल लावण्यात आले नव्हते. ज्या बसवर ही कारवाई केली ती ठाण्याहून गोव्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची पालिकेच्या कुचेली येथील प्रकल्पावर विल्हेवाट लावण्यात आली.

Trending

Exit mobile version