गोवा खबर

छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदूविरोधी नॅरेटिव्ह ! : माहूरकर, माजी माहिती आयुक्त, भारत सरकार

Published

on

Spread the love
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’

गोवा खबर:दक्षिण गुजरात ते तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत १६०० किलोमीटर लांबीचे राज्य निर्माण करून मुघल राजवटीच्या अंताची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक मोठे सम्राट आणि राष्ट्रनिर्माते होतेमात्र हिंदुविरोधकांनी त्यांचे महान कार्य दाबून त्यांना एक साधा मराठा योद्धा म्हणून इतिहासात दाखवले गेले आहेछत्रपती शिवाजी महाराज यांची महानता कमी करण्याचे काम चालू आहेआपल्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून स्वातंत्र्यानंतर बहुसंख्य हिंदूंवर मुघलांचा उदात्तीकरण करणारा खोटा इतिहास लादण्यात आलाअसे अनेक हिंदूविरोधी नॅरेटिव्ह आजही निर्माण करून हिंदूंमध्ये संभ्रमभेद आणि न्यूनगंड निर्माण करून हिंदूंना निष्प्रभ केले जात आहेयाविरोधात हिंदूंनी आता जागे होऊन हिंदूविरोधी नॅरेटिव्ह ओळखले पाहिजेत्याचा अभ्यास करून या हिंदूविरोधी नॅरेटिव्हचा समाजासमोर भांडाफोड केला पाहिजेअसे प्रतिपादन ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ संस्थापकलेखकइतिहासकार आणि भारताचे माजी माहिती आयुक्त श्रीउदय माहूरकर यांनी केले.


 ते फोंडागोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’त श्री विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेतील ‘हिंदूविरोधी नॅरेटिव्हला प्रत्युत्तर’ यावर बोलत होतेया वेळी व्यासपिठावर उत्तर प्रदेश येथील ‘प्राच्यम्’चे संस्थापक तथा विचारवंत श्रीप्रविण चतुर्वेदीहरियाणा येथील विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष तथा विचारवंत श्रीनीरज अत्री आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे हे उपस्थित होते.
हिंदूविरोधी नॅरेटिव्हविषयी सांगतांना श्रीमाहूरकर पुढे म्हणाले की, ‘हिंदूंना नॅरेटिव्हची (खोट्या कथानकाचीलढाई जिंकायला शिकावे लागेलहिंदूंच्या सहिष्णु स्वभावामुळेतसेच विजीगिषु वृत्तीच्या अभावामुळे ते नॅरेटिव्हच्या लढाईत नेहमीच हरत आले आहेतहे स्वातंत्र्यापासूनचे चित्र आहेवर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या आधी गोध्रा येथे ज्या साबरमती रेल्वेमध्ये ५९ हिंदू मारले गेलेमात्र मानरेंद्र मोदीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी मुस्लिमविरोधी लाट आणण्यासाठी हे कृत्य घडवून आणल्याचे कम्युनिस्ट आणि इस्लामी रणनीतीकारांनी सांगितलेप्रत्यक्षात मुसलमान जमावाने रेल्वेचे डबे जाळल्याचे गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालात समोर आले.


या वेळी ‘प्राच्यम्’चे संस्थापक तथा विचारवंत श्रीप्रविण चतुर्वेदी म्हणाले कीजो हिंदु धर्म प्रेमकरुणा आणि वैश्विक बंधुत्वाचे प्रतीक राहिला आहेत्याची जगभरात बदनामी केली जात आहेहिंदू युवकांमध्ये विशेषतसंभ्रम व एकमेकांबद्दल तिरस्कार भावना वाढीस लावण्यासाठी जातीयवादब्राह्मणवादी पितृसत्ता असे शब्द तयार केले गेले आहेतया खोट्या कथानकांचा प्रतिकार फक्त त्यांच्यातील खोटेपणा उघड करूनच करता येईलउदाहरणार्थ आपल्याकडे जात ही संकल्पना नव्हतीफक्त वर्ण होतेमात्र ब्रिटिशांनी आपल्याला विभाजित करण्यासाठी जात पद्धती तयार केलीयापुढे जाऊन भारतहिंदु धर्मसंस्कृती आणि हजारो वर्षांमध्ये सर्व क्षेत्रातील हिंदूंनी केलेले कर्तृत्व समाजापुढे मांडावे लागेल.

 विचारवंत श्रीनीरज अत्री म्हणाले कीविकृत कथनकाचा एक पैलू असा आहे कीपूर्णपणे अपयशी आणि विनाशकारी घटना देखील सामाजिक न्याय किंवा समावेशक म्हणून सादर केल्या जातातयाचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मानवी शरीराचा नाश करणारी ‘जेंडर ॲफिर्मेशन’ नावाची प्रक्रिया यात उपचार म्हणून पूर्णपणे अवैज्ञानिक पद्धत मांडली जात आहेआपला देशआपला समाज आणि भावी पिढ्या सुरक्षित ठेवता याव्यात यासाठी सखोल अभ्यास आणि संशोधन करूनच योग्य माहिती पोहोचवणे ही माध्यमांची जबाबदारी आहे.

Trending

Exit mobile version