गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी अधिका-यांसोबत आणि राजभवनातील कर्मचाऱ्यांसोबत जुन्या दरबार हॉलमध्ये योगासने केली.आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.
गेल्या दहा वर्षांपासून २१ जून रोजी जागतिक स्तरावर याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
एकूण आरोग्य आणि कल्याण सुधारण्यासाठी योगामध्ये प्रचंड क्षमता आहे.
जगभरात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी योगा सरावाला प्रोत्साहन मिळते. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ ची संकल्पना स्वतःसाठी आणि समाजासाठी योग अशी आहे.राज्यपालांनी आसन, प्राणायाम, मुद्रा आणि ध्यान असे योगाचे विविध प्रकार केले जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यास सर्वसमावेशक दृष्टिकोन देतात
अशा प्रकारे जीवनाची एकूण गुणवत्ता वाढविते.
श्री दत्त पद्मनाभ पीठ गोवाचे अनुभवी योग प्रशिक्षक श्री श्रीराज शेलार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.