गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकारी यांनी २३ जून २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी ६.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत आणि २४ जून २०२४ रोजी मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत सासष्टी तालुक्यातील १२ बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेली तसेच कुंडई ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ७, वळवई प्रभाग क्रमांक २, केरी ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ३, फोंडा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ११, राशोल ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ५: सेरावली ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक २, सासष्टी तालुक्यातील असोल्णा ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक १ आणि केपे तालुक्यातील शेल्डे ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये पोटनिवडणूक होणार असल्याने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.