गोवा खबर:“योग से ही होगा, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयुष मंत्रालयाने क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय, राष्ट्रीय आयुष मिशन आणि आरोग्य सेवा संचालनालय गोवा यांच्या सहकार्याने ताळगांव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे आयोजित केलेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात योगाच्या विविध प्रकारांच्या महत्त्वावर भर दिला.
योग दिनाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. मोदींनी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये ही कल्पना मांडली आणि संयुंक्त राष्ट्राने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला, जो आता १८० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो असेही ते पुढे म्हणाले.
डॉ. सावंत यांनी दैनंदिन दिनचर्यामध्ये योगाचा समावेश करण्याचे महत्त्व प्रतिपादले आणि दररोज फक्त अर्धा तास सराव केल्याने फिटनेस आणि आरोग्य लक्षणीयरीत्या वाढू शकते असे सुचविले. मुख्यमंत्र्यांनी नियमित योगासने केल्याने उच्चरक्तदाब आणि मधुमेह सारख्या रोगाना नियंत्रणात आणण्यात मदत होते आणि प्राणायाम आणि योगामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते असे ते म्हणाले. हे वर्ष “भरड धान्य वर्ष” म्हणून साजरे केले जात आहे, त्याचे असंख्य आरोग्य फायदे लक्षात घेऊन भरड धान्याचा आहारात समावेश करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण श्रीनगर येथून थेट प्रक्षेपित करण्यात आले. या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना, “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग अशी आहे.
कार्यक्रमादरम्यान, डॉ. प्रमोद सावंत यांनी अभ्यासाप्रती असलेली त्यांची बांधिलकी प्रतिपादून विविध योगासने करण्यात विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले. यावेळी मुख्य सचिव श्री पुनीतकुमार गोयल, आयएएस, क्रीडा सचिव श्रीमती. स्वेतिका सचान, आयएएस, प्रधान सचिव (वित्त) डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, क्रीडा संचालक श्री अरविंद खुटकर, क्रीडा संचालक श्री अरविंद खुटकर, शिक्षण संचालक श्री शैलेश झिंगडे, आरोग्य उपसंचालक डॉ.रुपा नाईक, कृषी संचालक श्री संदीप फळदेसाई, आयुष सेलचे उपसंचालक डॉ. मीनल जोशी, आणि नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक श्री कालिदास घाटवळ यांच्यासह इतर सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी कृषी संचालनालयाने आयोजित केलेल्या बाजरीच्या स्टॉललाही भेट दिली, ज्यामुळे निरोगी आहाराच्या निवडीला चालना देण्यावर या कार्यक्रमाचा भर होता.
डॉ रश्मिना आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले.