गोवा खबर

राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने  गोव्याचे  साहील नारुलकर कोल्हापूरात सन्मानीत

Published

on

Spread the love
गोवा खबर: देशातील प्रसार माध्यमांनी नेहमीच उपेक्षित वंचित, व दुर्लक्षित समाजाचे प्रश्न चव्हाट्यावर मांडून त्यां सोडविण्यासाठी पत्रकारिते चा वापर केला आहे व आज देश जो प्रगती पथावर दिसत आहे किवा देशाचा विकास दिसत आहे तो पत्रकारानी  समाज्याच्या समस्या ना वाचा फोडल्या मुळेच झाला आहे , असे विचार  संभाजी ब्रिगेड चे राज्य कार्याध्यक्ष हिंदूराव हुजरे-पाटील पाटील यानी व्यक्त केले. 
निर्मिती प्रकाशन व बाल साहित्य कला मंच ने आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील शाहु स्मारक भवन च्या  सभाग्रहात पुरस्कार वितरण व लघुपट प्रदर्शन समारंभात ते बोलत होते.
 या वेळी व्यासपीठावर प्रा, हिंदुराव  कांबळे, प्राचार्य शहाजी कांबळे, डाँ,शोभा चाळके,  पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष, डाॅ नंदकुमार गोंधळी  ,पुण्य नगरीचे मुख्य प्रतिनिधी  चंद्रकांत पाटील   लघुपट निर्माते  अनिल म्हामने   अँड करुणा विमल, जेष्ठ साहित्यिक डाँ स्मीता गीरी, डाँ नामदेव मोरे डाँ हंबीरराव तरटे प्राचार्य विश्वास राव तरडे  , स्वामी विवेकानंद संस्था पेडणे गोवा चे  उपाध्यक्ष पत्रकार उमेश शंकर गाड यांच्या बरोबर च पुरस्कार विजेते  साहील नारुलकर,
दयानंद लिपारे,  रणजित माजगावकर, शितल धनावडे, नसीर अत्तार सुनील ठाणेकर, बाळासाहेब कोळेकर, राजाराम लो़ढे क्रुष्ण चौगुले सागर यादव सतीश घाटगे संगम कामळे अमोल सावंत, दुर्वा दळवी  अभिजीत पाटील आदि  सत्कार मुर्ती पत्रकार  उपस्थित होते
देशात यादवी माजावी अशी अस्थिर परीस्थितीत आज निर्माण झालीआहे, कुणाचा पायपोस कुणाला नाही. आरक्षणासाठी टाहो फोडला जात आहे, अशावेळी विचारवंतांनी मंथन करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर निर्मिती विचारमंचने आयोजीत केलेल्या राजर्षी राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवातील ‘आरक्षणाची दुसरी बाजू’ हा लघु चित्रपट सामाजीक सलोखा संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी आशा लघुपट निर्मिती प्रमुख अँड करुणा विमल यांनी केली
या कार्यक्रमात राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव उ‌द्घाटन, व निबंध स्पर्धांचा पारितोषीक वितरण, पत्रकारांना  सामाजीक कृतज्ञता पुरस्कार वितरण आणि शाहू प्रेरणा पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रम    शाहू स्मारक भवन च्या वेगवेगळ्या सभागृहात एकाच दिवशी आयोजित केला होता त्यात जेष्ठ पत्रकार  चंद्रकांत पाटील याना  मानाचा सामाजिक क्रुतज्ञता जीवन गौरव पुरस्कार व युवा पत्रकार साहील नारुलकर याना राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले  तर इतर पत्रकाराना सामाजिक क्रुतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
निर्मिती विचार मंच चे अनिल म्हामने  यानी आपल्या भाषणात सांगितले की प्रसार माध्यमांनी नेहमीच उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षितांच्या समस्या, प्रश्न चव्हाट्यावर मांडून त्या सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला आहे. राजकारण्यांवर अंकुश ठेवून देशाची लोकशाही निकोप करण्यामध्ये माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे.  आम्ही जेष्ठ पत्रकार चंदकातपाटील यांचे अनुभव घेउन तसेच साहील नारुलकर सारख्या उमद्या युवकांना पुरस्कार देऊन त्यानी आपल्या सारखे जबाबदारी ओळखणारे तरण निर्माण करावेत  असे आवाहन केले .
पुरस्कार स्वीकारल्यावर पत्रकार साहील नारुलकर यानी आपल्या भाषणात सांगितले की   प्रत्येकाने आपल्या कुटुंबात मुलांशी चांगले व्यवहार व व बोलण्याची चांगली भाष असावी  महाराष्ट्र व इतर भागातील लोकानी गोव्याचे  बघताना समुद्र किनाऱ्यावर चे गलिच्छ वातावरण न बघता त्यांची रस्ता व इतर भागातील संस्कृती व परंपरांचा आस्वाद घ्यावा तरच खरा गोवा आपल्याला दिसेल.
कार्यक्रमाचे  सुत्र निवेदन प्रा. शहाजी कांबळे यांनी केले  पुरस्कार वितरणाचे निवेदन डाँ नामदेव मोरे यानी केले तर आभार प्रदर्शन निर्मिती फिल्म क्लबच्या प्रमुख डॉ. शोभा चाळके यानी केले.

Trending

Exit mobile version