गोवा खबर:गृह खात्याने १८ जून २०२४ रोजी स्वातंत्र्य सैनिकांना आग्वाद किल्ला आणि आझाद भवन, पर्वरी येथे होणाऱ्या क्रांती दीन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी कदंब बसची व्यवस्था केली आहे. स्वातंत्र्य सैनिकांना आग्वाद किल्ल्याकडे घेवून जाण्यासाठी जीए-०३ एक्स-०६०९ या क्रमाकाची कदंब बस (बस ड्रायव्हर श्री. प्रसाद सोळंकी- मो. नं. ९३७३६५०३८३) पणजी फेरी धक्क्याकडे पार्क केलेली असेल.
पणजीतील आझाद मैदानावरील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पणजी फेरी धक्क्याकडे पार्क केलेली कदंबा बस स्वातंत्र्य सैनिकांना घेवून आग्वाद किल्ल्याकडे जाणार आणि आग्वाद किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यानंतर बस स्वातंत्र्य सैनिकांना घेवून पर्वरी आझाद भवनकडे जाईल. आझाद भवनातील कार्यक्रमानंतर कदंब बस स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी पणजीतील कदंब बस स्टॅण्डवर घेवून येईल.