गोवा खबर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन येथे सहकार मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
पदभार स्वीकारल्यानंतर एक्सवर त्यांनी सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेनुसार सहकार मंत्रालय शेतकऱ्यांना सक्षम करून ग्रामीण अर्थव्यवस्थेसह देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी काम करत राहील. आमचे सरकार या क्षेत्राशी निगडित कोट्यवधी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, त्यांना नवीन संधी देऊन सहकार्याच्या कल्पनेला बळ देण्यासाठी वचनबद्ध आहे.”