गोवा खबर

नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो

Published

on

Spread the love

पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाइल पीएम किसान निधीशी संबंधित

आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे : पंतप्रधान

आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे : पंतप्रधान

 

गोवा खबर:तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाइलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल.

फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.”

Trending

Exit mobile version