गोवा खबर

१८ जून रोजी गोवा क्रांती दिवस

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा सरकारतर्फे १८ जून रोजी सकाळी ८.४५ वाजता गोवा क्रांती दिन साजरा करण्यात येणार आहे. पणजीतील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात गोव्याचे राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोवा विधानसभेचे सभापती श्री रमेश तवडकर, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते श्री युरी आलेमांव, स्वातंत्र्य सैनिक व इतर मान्यवर हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतील.

बालभवनमधील गायन पथक देशभक्तीपर गीते सादर करतील.

मागील वर्षांप्रमाणे गोवा क्रांती दिन तालुका व जिल्हा पातळीवरही साजरा करण्यात येणार आहे. मडगांव येथील लोहिया मैदानावरील कार्यक्रमास सकाळी ८.३० वाजता पर्यावरण, कायदा मंत्री श्री. आलेक्स सिक्वेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

फोंडा येथील क्रांती मैदानावरील गोवा क्रांती दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री श्री. रवी नाईक, उपस्थित राहतील.

Trending

Exit mobile version