गोवा खबर: वास्को स्पोर्ट्स क्लब ६ ते ८ जून दरम्यान त्यांच्या १३ वर्षांखालील फुटबॉल संघासाठी तर १० ते १२ जून दरम्यान त्यांच्या १५ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघासाठी निवड चाचणी घेणार आहे. शनिवारी क्लबने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की ,वरील तारखांना दुपारी ४ ते ६ दरम्यान वास्को येथील मांगोर स्पोर्ट्स क्लब मैदानावर या चाचण्या घेतल्या जातील.
इच्छुक मुलांनी चाचणीच्या पहिल्या दिवशी दुपारी ३.३० वाजता त्यांचे खेळण्याचे किट, मूळ जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड घेऊन मैदानावर हजर राहावे. त्यांना स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७७०९७७५६८८ आणि ९७०२०९७०३५ वर संपर्क साधावा.