गोवा खबर

डबल इंजिनच्या नावाने बीजेपीनें  गोवेकरांना उध्वस्तच केले:मनोज परब

Published

on

Spread the love
कोकण रेल्वेनें रेंट अ बाईक – सेवा सुरु करण्याच्या निर्णयाचा मनोज परब यांनी केला निषेध 
गोवा खबर:बीजेपी सरकारकडून देशभर डबल इंजिन सरकारच्या नावाने जनतेची फसवणूक करण्यात आली. मोदी सरकार – डबल इंजिन सरकारच्या  नावाने  विकासाची खोटी स्वप्ने दाखवून, विकसित भारत, स्वयंपूर्ण गोवा अशा एक ना अनेक घोषणा देऊन जनतेची दिशाभूल तर केलीच उलट जी जनता स्वतः कष्ट करून छोटे मोठे उद्योग धंधे करून आपला संसार, आपला उदरनिर्वाह चालवत होते, आज तेच धंधे ह्या बीजेपी सरकार बिल्डर लॉबी, कॉर्पोरेट वाल्यांच्या घशात घालून जनतेच्या पोटावर लाथ मारून, त्यांना कायमचे उध्वस्थ करण्याचा घाट सध्या ह्या सरकारणे घातला असल्याचा आरोप  रेव्होलुशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच कोकण रेल्वेनें रेल सेवा व्यतिरिक्त  रेंट अ बाईक – कार सेवा सुरु करण्याच्या निर्णय घेतला होता व त्यानुसार ती टेंडर प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र आर. जी. पक्षाचे प्रमुख मनोज वराब यांनी ह्या निर्णयाला आपला खरं विरोध दर्शवीला असून, जर सरकारनें  कोकण रेल्वेच्या ह्या निर्णयाला पाठिंबा दिल्यास जे गोवेकर  रेंट अ बाईक – कार सेवा ह्या व्यवसायात करुन आपला उदरनिर्वाह चालवतात त्याच्यावर  उपासमारीची वेळ येणार असल्याचेही मनोज परब म्हणाले. राज्य सरकारच्या बेजबाबदार आणि निष्काळजी धोरणामुळे आधीच राज्यातील टॅक्सी व्यवसाय उबर- ओला ह्या सारक्या बड्या कॉर्पोरेट वाल्याच्या हातात दिलेला असून, इतकी वर्षे ज्यांनी पर्यटकाना व्यवस्थिती सेवा दिल्या, त्याला टॅक्सी व्यवसायिकावर ह्या डबल इंजिन सरकारने उपास्मारीची वेळ आणली आहे.  आताही, कोकण रेल्वे अशाच प्रकारे बड्या कॉर्पोरेट वाल्याना हाताशी धरून, उरलेले उद्योग धंधे रेंट अ कार – बाईक सेवा  हिसकावून घेऊन कायमचे उध्वस्त करू पाहत असून, जेव्हा जेव्हा डबले इंजिन सरकार घडले आहे तेव्हा तेव्हा राज्यातील जनतेचे व्यवसाय व उद्योग धंधे काडून कॉर्पोरेट वाल्याच्या घशात घालून, सामान्य गोवेकरांना लाचार कारण्याचेच काम ह्या डबले इंजिन सरकार करत आल्याचा आरोप मनोज वराब यांनी केला.
आर. जी पक्षाचे प्रवक्ते रोहन कळंगुटकर जे स्वतः ह्या टॅक्सी, कार सेवा व्यवसाय जवळपास विषय वर्षांपासून करत आहेत त्यांनी सुद्धा  कोणाक्षण रेल्वेच्या ह्या निर्णयाचा निषेध करत राज्य सरकारला गोवेकरांवर केला जाणाऱ्या अशा अन्यायावर गंभीरतेने लाजशील घालून, कॉर्पोरेट वाल्यांचे समर्थन न करता गोवेकरांना आधार देऊन, त्यांना त्यांच्या व्यवसायाची, उदरनिर्वाहाची सुरक्षितता देऊन त्यांचे रक्षण करण्याची विनंती केली. आधीच टॅक्सी व्यावसायिक हालाकीच्या परिस्थितीत असून, जर असेच सरकारचे धोरण राहिले व कॉर्पोरेट वाल्यांना बाल्कती देण्याचे काम सुरूच ठेवले तर उरलेल्या व्यवसायावर सुद्धा हे कॉर्पोरेटवाले कब्जा करून गोवेकरांना कायचे संपवणार असल्याची भीतीही कळंगुटकर यांनी व्यक्त केली.

Trending

Exit mobile version