गोवा खबर:गोवा सरकारच्या कृषी संचालनालयाने पावसाळ्यात खरीप पिकांच्या लागवडीसाठी बियाणें, यंत्रे, कलमे आणि इतर लागवडीचे साहित्य उपलब्ध केले आहे. कृषी संचालनालयाने राज्यांतील सर्व विक्री केंद्रांवर पन्नास टक्के अनुदानीत दरात जया, ज्योती आणि कर्जत भाताचे बियाणें उपलब्ध केले आहे. सदर खात्याने शेतकऱ्यांना प्रत्येक तीन वर्षानी भाताचे बियाणें बदलण्याचा सल्लाही दिला आहे.
खात्याने वेगवेगळ्या भाज्यांचे बियाणेही पन्नास टक्के अनुदानीत दरात उपलब्ध केले आहे. विभागिय कृषी कार्यालयाच्यावतीन शेतकऱ्यांना शेत नांगरणी आणि लागवडीसाठी अनुदानीत दरात ट्रॅक्टर उपलब्ध केला आहे. कृषी यंत्रे शेतकरी गट आणि संस्थांनी स्थापन केलेल्या ग्राहक सेवा केंद्रामार्फत देतात.
तसेच खात्याच्या नर्सरीमध्ये स्वस्त दरात कवाथे, आंबा, काजू, पेरू, चिकू आणि इतर फळझाडांची कलमे विक्रिस उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या विभागिय कृषी कार्यालयांत संपर्क करावा. शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन पावसाळ्यात विविध पिकांची लागवड करून भरघोस पीक घेण्याचा सल्ला खात्याने दिला आहे.