गोवा खबर

वाळपईच्या हेडगेवार हायस्कूलला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून 2 कोटींची देणगी

Published

on

Spread the love
गोवा खबर:वाळपई येथील डॉ. हेडगेवार शिक्षण संस्था संचलित हायस्कूलला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दोन कोटींची देणगी जाहीर केली.वाळपई येथील डॉ. हेडगेवार शिक्षण संस्था संचलित हायस्कूलला नवीन वास्तूचे आज केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते लोकार्पण झाले. हा कार्यक्रम होण्यापूर्वी आरोग्यमंत्री राणे यांनी 2 कोटींची देणगी जाहिर करत सर्वांना सुखद धक्का दिला..
आरोग्यमंत्री राणे यांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत भरीव योगदान दिलेलेआहे.
अलिकडेच त्यांनी एका गरीब मूलीचे कन्यादान केले होते.त्याशिवाय घर कोसळलेल्या महिलेचे घर बांधून देण्याचे सांगून कामाला सुरुवात केली होती.
आज डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेला त्यांनी दोन कोटींची देणगी जाहीर केल्यानंतर त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या संदर्भात संबंधित शाळा व्यवस्थापनानेही आभार मानले आहेत.सत्तरीतील शैक्षणिक प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध असून, यापुढेही सढळ हस्ते मदत करू, असे विश्वजीत राणे यांनी आश्वस्त केले आहे..

Trending

Exit mobile version