गोवा खबर

मतदानाच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश जारी

Published

on

Spread the love

गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ७ मे २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी ६.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १०० मीटरच्या आत असलेली सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, भोजनालये, चहाची दुकाने, पान दुकाने मतदान इत्यादी उपरोक्त तारखेला आणि वेळेत बंद राहतील.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या २०० मीटरच्या आत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात असलेली सर्व रेस्टॉरंट्स, बार, भोजनालये, चहाची दुकाने, पान शॉप्स आणि इतर खाद्यपदार्थ, गड्डा इत्यादी वरील तारीख आणि कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. (मतदान केंद्रावरील रांगेतील मतदार वगळून) ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास किंवा गर्दी करण्यास बंदी घातली आहे.

कामावरील लोकसेवक, परवानगी मिळविलेले लग्न सोहळे, अंतविधी किंवा कोणताही खास प्रसंग किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे विश्वसनीय प्रसंग ज्याना संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडून पूर्व लेखी परवानगी घेतली आहे त्यांना ही बंदी लागू नसेल.आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत दंडात्मक कारवाई जबाबदार करण्यात येईल.

Trending

Exit mobile version