गोवा खबर:गोवा राज्यातील लोकसभेच्या निवडणूकीमुळे ५ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते ७ मे २०२४ रोजी मध्यरात्रीपर्यंत आणि ४ जून २०२४ रोजी मतमोजणीच्या दिवशी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.