विकास हाच भारतीय जनता पार्टीचा एजंडा – श्रीपाद नाईक
पर्ये मतदारसंघातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद : वीसही मतदारसंघात प्रचार दौरे
गोवा खबर: सगळे बरोबर राहिले, संघटितपणे काम केले तर कशा प्रकारे विकास होऊ शकतो हे दूरदृष्टी लाभलेले गोव्याचे आरोग्य मंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजित राणे आणि पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी संपूर्ण गोव्याला दाखवून दिले आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले विकास हा भाजपाचा एजंडा आहे आणि अधिक विकास साधण्यासाठी, देश अधिक बलवान बनविण्यासाठी मोदीजी पुन्हा एकदा प्रधानमंत्री होण्याची गरज आहे.
श्री. नाईक वाळपईच्या भाजपा कार्यालयात पर्यें मतदार संघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि महिला मोर्चा सदस्यांना संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी विश्वजित राणे, डॉ. देविया राणे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सगुण वाडकर, भाजपाचे अन्य नेते उपस्थित होते.
त्यानंतर माऊशी येथील चवटेश्वर सभागृहात व केरी येथील केरी युथ क्लबच्या सभागृहात झालेल्या जनसभांना प्रचंढ प्रतिसाद लाभला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विश्वजित राणे आणि डॉ. देविया राणे यांनी या सभांना मार्गदर्शन केले. यावेळी माऊसचे सरपंच सोमनाथ काळे, उप-सरपंच श्रीमती राधीका सावंत, जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती देवयानी गावस, पंच सदस्य उपस्थित होते. श्रीपाद नाईक यांना सत्तरीतून मोठी आघाडी मिळवून देण्याचा संकल्प या सभांत करण्यात आला.
सत्तरीची जनता नेहमी श्रीपाद नाईकांच्या पाठिशी – विश्वजित राणे
निडणुका जाहीर झाल्याबरोबरच सत्तरीत आमच्या प्रचार कार्याला सुरूवात झाली. गेल्या महिनाभरात आम्ही गावांगावत बैठका घेतल्या. श्रीपाद नाईक एक सज्जन व्यक्ती आहे. त्यांनी नेहमीचे हीत चिंतलेले आहे. सत्तरीची जनताही ठामपणे त्यांच्या पाठिशी राहिलेली आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करूया, असे आवाहन सत्तरीचे आमदार विश्वजित राणे यांनी केले.
श्रीपादभाऊंची सत्तरीत कोट्यवधी रु.ची विकासकामे – डॉ. देविया राणे
श्रीपादभाऊंनी उत्तर गोव्यातील गावां गावांत विकसकामें केलेली आहे. सत्तरीत त्यांनी कोट्यवधी रु.ची कामें केलेली आहे असे सांगून पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे म्हणाल्या की, सत्तरीचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे, त्यांचा मोठ्या प्रमाणात श्रीपादभाऊंना पाठिंबा आहे, हे आम्हाला केंद्राला सिद्ध करून दाखवायचे आहे.
वीसही मतदारसंघात प्रचारसभा
पर्ये मतदारसंघातील भव्य सभांबरोबर श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यातील २० विधानसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यांची पहिली फेरी पूर्ण केली आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्री. नाईक यांनी बैठकांचा सपाटा लावला. आतापर्यंत त्यांनी १४० पेक्षा अधिक बैठका/सभा घेतल्या. या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध गटांशी चर्चा केली. नवीन मतदारदार, नारीशक्ती, शेतकरी, व्यापारी, रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करणारे व्यापारी, क्रीडा संस्था, विविध देवस्थान समित्यांचे पदाधिकारी आदींच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणवून घेतल्या.
या दौऱ्यादरम्यान सलग सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढविणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे बाल, तरुण आणि ज्येष्ठांमध्ये किती लोकप्रिय आहेत, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. समाजामध्ये त्यांच्याबद्दलचे प्रेम, आपुलकी कायम टिकून असल्याचे दृष्य पहायला मिळाले.
१२०० पेक्षा अधिक प्रकल्प
सलग पांच वेळा उत्तर गोव्यातून निवडून आलेले श्रीपाद नाईक यांनी खासदार निधीअंतर्गत १२०० पेक्षा अधिक प्रकल्प उभारले. धारगळ येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, करंझाळे येथील राष्ट्रीय जलक्रीडा संस्था, बांबोळी येथील सुपर स्पेशलिटी ब्लॉक, रायबंदर येथील आयुष संशोधन केंद्र, जिल्हा इस्पितळें हे त्यांनी त्यांच्या कार्यकाळा उभारलेले काही महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. मोपा विमानतळ उभारण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे.
शिक्षण व आरोग्याला श्री. नाईक यांनी नेहमी प्राधान्य दिले. सीएसआर निधीअंतर्गतही त्यांनी अलिकडेच गोवा आरोग्य खात्याला चार अत्याधुनिक एम्बुलेन्सिस दिल्या. जीएमसीसाठी त्यांनी रु. अडीच कोटींची सर्व सुविधांनी युक्त असलेली कॅन्सर डिटेक्शन बस दिली, सिटी स्कॅन मशिन दिले. उत्तर गोव्यातील शाळा महाविद्यालयांना सेनेटरी पॅड डिस्पेन्सर व सेनेटरी इन्सिनरेटर मशिन्स पुरविले.
`सारथी` या अहवाल पुस्तकाचे विमोचन
आज सकाळी श्री. नाईक यांच्या गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेणारे `सारथी` या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. भाजपाच्या मुख्यालया झालेल्या प्रकाशन सोहळ्यात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सचिव दामू नाईक आणि भाजपाचे नेते सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.