गोवा खबर:आयुक्त कार्यालय, कामगार आणि रोजगार यांनी विभागाकडून उष्णतेच्या लाटेची तयारी आणि शमन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
गोवा उष्णतेची लाट कृती आराखडा २०२४ च्या संदर्भात, सर्व खाती, उद्योग, आस्थापनांनी याची खात्री करणे आवश्यक आहे की विशेषतः घराबाहेर काम करणाऱ्यां कामगारांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याची खात्री करावी. दुपारी १२.०० ते ३.०० पर्यंतच्या उष्णतेच्या लाटेचे तास टाळण्यासाठी कामाच्या वेळेत बदल केला पाहिजे आणि यासाठी कामाचे तास पुन्हा तयार करावे.
शिवाय, कामकाजाच्या आवारात तसेच बाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
कोणत्याही कामगार, मजूरांना उष्णतेचा त्रास झाल्यास अशा कामगारांना वैद्यकीय सेवेसाठी हलविणाऱ्या पर्यवेक्षी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सुविधा, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांना अशा मजुरांच्या केस हिस्ट्रीबद्दल माहिती दिली पाहिजे, ज्यामुळे योग्य उपचार दिले जातील.
कामगार अधिकाऱ्यांनी यापुढे आरोग्य शिबिरे विशेषत: अनौपचारिक क्षेत्रात आणि वसाहतींमध्ये आणि सार्वजनिक बांधकाम खाते (PWD), जलसंपदा खाते (WRD) च्या बाह्य बांधकाम साइट्स व्यतिरिक्त बांधकाम साइट्स, उद्योग आणि व्यावसायिक संस्थांसोबत तसेच गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (GSIDC) आणि इतर खाजगी बांधकाम साइट्समध्ये संवादात्मक सत्रे आयोजित करणे आवश्यक आहे.
या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी संबंधित अधिकारक्षेत्रातील सहाय्यक कामगार आयुक्त कामाचे निरीक्षण करतील आणि छायाचित्रासह अहवाल संबंधित उप कामगार आयुक्तांना सादर करतील आणि ते असे अहवाल एकत्रित करून उपसंचालक प्रशासन (DDA) मार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करतील.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता , विद्युत खात्याचे मुख्य विद्युत अभियंता, जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, महानगरपालिका प्रशासन संचालनालय, पंचायत संचालनालय यांनी आपापल्या अभियंता आणि कंत्राटदारांना उष्णतेच्या लाटेबाबत घ्यावयाच्या खबरदारीच्या संदर्भात जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .