गोवा खबर

निवडणूक काळात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील तिसवाडी तालुक्यातील ताळगांव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमुळे २७, २८ आणि २९ एप्रिल २०२४ रोजी मतमोजणीच्या दिवशी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.

Trending

Exit mobile version