गोवा खबर

दारूच्या वाहतुकीवर निर्बंध

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा राज्यांतील उत्तर गोवा जिल्ह्यातील तिसवाडी तालुक्यातील ताळगांव ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दारूची वाहतूक करण्यास किंवा जवळ बाळगण्यास निर्बंध लागू केले असून कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा  विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील  किंवा जवळ बाळगू शकतात.

वरील निर्बंध २७, २८  एप्रिल २०२४  रोजी आणि २९ एप्रिल २०२४ रोजी मतमोजणीच्या दिवशी ताळगांव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी लागू राहील.

Trending

Exit mobile version