गोवा खबर

हॉटेल/घरमालकांनी आपल्या ग्राहकांची, भाडेकरूंची माहिती नोंद करण्याचा आदेश

Published

on

Spread the love

 गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे दक्षिण गोव्यातील सर्व हॉटेलांचे मालक/व्यवस्थापन, लॉजिंग-बोर्डिंग, खाजगी गॅस्ट हाऊस, पेईंग गेस्ट हाऊस, निवासाची व्यवस्था करणारे घरमालक आणि धार्मिक संस्थांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी ग्राहकाकडे मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्राची मागणी करावी. ओळख पटविल्याशिवाय ग्राहकांना आपल्या हॉटेलात किंवा घरांत राहण्यास देऊ नये.

तसेच मालकांनी आपल्या ग्राहकांची आणि भाडेकरूंची माहिती पोलीस खात्याने तयार केलेल्या पथीक-PATHIK या सॉफ्टवेरांमध्ये नोंद केली पाहिजे. भाडेकरूची माहिती  जवळच्या पोलीस स्टेशनवर देण्याची गरज आहे. मालकांनी आपल्या ग्राहकांची आणि भाडेकरूची माहिती सांभाळून ठेवावी आणि गरज असते तेव्हां अशी माहिती पोलीस यंत्रणेस उपलब्ध करावी.

त्याचप्रमाणे दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांनी त्यांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात करावेत तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत किंवा पॅनिक बटण हूटर, सीसीटीव्ही कॅमेरे, दोन सुसज्ज ईएसएस (इलेक्ट्रॉनिक सर्व्हे सिस्टीम) मार्ग संचार प्रणाली आणि रिमोट कंट्रोल बसवावेत..

Trending

Exit mobile version