गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना राम नवमीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

 

 

 
  • गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना राम नवमीच्या  हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत
  •  आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तो अविस्मरणीय दिवस म्हणजे राम नवमीचे प्रतीक आहे. दरवर्षी हिंदू समाज देशभरात रामनवमी मोठ्या आनंदाने आणि धार्मिक उत्साहाने साजरी केली जाते. प्रभू राम “मर्यादा पुरुषोत्तम” म्हणून ओळखले जातात, ते सत्याचे, धार्मिकता आणि नैतिकतेचे प्रतीक आहे तसेच वाईटाचा नाश करणारा आहे. राम नवमी लोकांना आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचे नूतनीकरण करण्याची संधी देतो आणि सद्गुण आणि सामाजिक सौहार्द, सद्भावना, आध्यात्मिक एकता आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची संधी देतो.
  •         या रामनवमीच्या निमित्ताने आपण संपूर्ण सौहार्दाच्या आणि बंधुत्वाच्या भावनेने एकत्र राहण्याचे व्रत घेऊया आणि कोणत्याही वाईट शक्तींना आमची शांतता, राष्ट्रीय एकता आणि अखंडता, नष्ट करू देऊ नका असे राज्यपाल पुढे म्हणतात.
  •         या वर्षीचा  रामनवमीचा उत्सव सर्व लोकांना संपूर्ण वचनबद्धतेने एक सद्गुणी आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्यास प्रोत्साहित करो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version