गोवा खबर: गोवा येथे सुरू असलेल्या ड्रीम स्पोर्टस चॅम्पियनशीप स्पर्धेत बेळगाव युनायटेड फुटबॉल अकादमी संघाने एसइएसए फुटबॉल अकादमी (SESA Football Academy)संघाचा २-० असा सहज पराभव केला.
नावेलिम फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या लढतीत स्पोर्टिंग क्लब दी गोवा व मार्गारेट बॉस्को बाल सदन यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत सुटली. स्पोर्टिंग क्लब दी गोवाकडून रुजुल संगोडकर, कबीर मुळगुन यांनी तर, मार्गारेट बॉस्को बाल सदनकडून दामोदर व रॉबर्ट यांनी गोल केले.