गोवा खबर

आर.जी. पक्षाचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला मार्शेल मधून सुरुवात, जनतेकडून मिळत आहे प्रतिसाद

Published

on

Spread the love
काँग्रेस बीजेपी उमेदवारांना घरी बसविण्याच्या जनतेने केला आहे पूर्ण निश्चय: मनोज परब
गोवा खबर:प्रियोळ मतदारसंघात रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाचा घरोघरी जाहीरनामा पोहोचविण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील प्रचार संपलेला आहे. काल सोमवारी आर.जी. प्रियोळतर्फे दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली असता मनोज परब यांनी स्वतः मार्शेल बाजारात आपला जाहिरातनामा वाटप करीत जनतेला पाठिंबा देण्याची विनंती केली. यावेळी प्रियोळ मतदारसंघाचे आर.जी. पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो सदस्य व समर्थक उपस्थित होते.
काँग्रेस बीजेपी पक्षांच्या खासदारांनी आजतागायत निवडून येऊन फक्त बघ्याची भुमिका घेतली आहे. ते फक्त केंद्र सरकारचे एजंट असल्यासारखे वागले आहेत. ह्या आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेस बीजेपी पक्षाने सत्तरी, पंच्याहत्तरी पार केलेल्या अकार्यक्षम नेत्यांना उभे केलेले असून, ते या आधीही अकार्यक्षम असल्याचे सिद्ध झालेले आहेत. गोव्यातील जनतेला आता तरुण, युवा नेतृत्व पाहिजे, जेणेकरून तो सर्व गोमंतकीय जनतेचा आवाज होऊन दिल्ली संसद भवनात गोवेकरांचे ज्वलंत विषय मांडून ते सोडविण्यासाठी झटणार. असे युवा आणि धडाडीचे उमेदवार फक्त आणि फक्त आर.जी. पक्षाने लोकसभेच्या रिंगणात उतरविले असून, जनतेचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळत आहे. बीजेपी काँग्रेस हे सेटिंगबाज असून, त्यांच्या स्वार्थी उमेदवारांना राजकारणातून कायमचे रिटायर्ड करून घरी बसविण्याचा जनतेने आता निश्चय केलेला असून, ह्या निवडणुकीत गोवेकरानी आर.जी. पक्षालाच आपला आवाज असल्याचे मान्य करत पूर्ण विश्वास हा आर.जी. पक्षावर ठेवलेला आहे. आर.जी.पक्ष हा एकमेव पक्षच गोवा गोवेकरांचे अस्तित्व राखण्यासाठी धडपडतो, तेव्हा आता विश्वास हा फक्त रेव्होलुशनरी गोवन्स हे जनताच म्हणत असल्याचे मनोज परब म्हणाले.
या मार्शेल इथल्या प्रचारादरम्यान उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांच्या बरोबर सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार विरेश बोरकर हे सुद्धा हजर होते. त्यांनी सुद्धा जनतेशी हस्तांदोलन करत यावेळी बदल घडवून आणण्याची विनंती जनतेकडे केली. आर.जी. पक्षाच्या कामाची जनतेने दाखल घेतली असून, ज्या ग्रामपंचायतींनी मनमर्जी कारभार चालत होता. प्रत्येक मतदारसंघात, हुकुमशाही वाढली होती, तिथे आता आर.जी. स्वतः लोकांचा आवाज आणि विश्वास म्हणून पुढे सरसावली आहे. याचीच दाखल घेत इतका मोठा आणि अद्भुत प्रतिसाद जनतेकडून आर. जी. पक्षाला मिळत असून, ज्या काँग्रेस आणि बीजेपी पक्षाने फक्त आणि फक्त दिशाभूल करात इतकी वर्षे सत्ता भोगली त्यांच्या पायाखालची जमीन आता हलू लागली आहे. आता गोवेकरांच्या आशीर्वादाने आर.जी. दिल्ली संसदेत गोवेकरांचा आवाज बनून जाणार असून, येणारा काळ हा गोवेकरांचा असणार असल्याचे मत विरेश बोरकर यांनी व्यक्त केले.

Trending

Exit mobile version