गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर: राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना विशेषता: मुस्लिम बांधवांना ईद- उल- फित्रच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “ईद-उल-फित्र म्हणजे रमदान या पवित्र सणाच्या उपवासाची समाप्ती. रमदान म्हणजे फक्त खाण्यापिण्यापासून परावृत्त होणे नाही तर वाईट विचार, शब्द व कृती यांपासून दूर राहणे असाही आहे. हा सण म्हणजे विश्वास, त्याग, प्रेम, करुणा आणि एकता यांचे प्रतीक आहे.

 पैगंबर मोहम्मद यांनी प्रेम, शांतता, बंधुता आणि करुणा या शाश्वत मूल्यांची शिकवण दिली आणि त्यांची आठवण करण्यास हा ईद- उल- फित्र सण आपल्यासाठी योग्य आहे.

. ईद-उल-फित्र हा सण आपण सर्वांना आनंद, शांतता, समृद्धी घेऊन येवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version