गोवा खबर

दृष्टीकडून ईस्टरच्या आठवड्यात सहा जणांना जीवनदान 

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: लांबलचक ईस्टरच्या आठवड्यादरम्यान, दृष्टी जीवरक्षकांनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सहा जणांना बुडण्यापासून वाचवले. तसेच जीवरक्षकांनी एखाद्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. याच आठवड्यात हरवलेल्या मुलाचे सुद्दा एक प्रकरण होते, त्याला सुद्दा यशश्वीपणे त्याच्या पालकांकडे सोडण्यात आले.

 

अगोंडा येथे, मुंबईतील ३२ वर्षीय रहिवासी समुद्रकिना-यावरील खडकाळ भागाजवळ रिप करंट मध्ये फसून बुडाल्यानंतर जीवरक्षक सत्यवान वेळीपने त्याला वाचवले, मुंबई स्थित या पर्यटकाला पाण्यात कोसळताना बघून जीवरक्षकांनी जेट स्की त्याच्याशी पळवली आणि त्याला जेटस्की आणि रेस्क्यु ट्यूबच्या मदतीने सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.

Goa Tourism Department
काणकोण मध्ये आज शिगमोत्सव!

कलकत्त्यातील एका ४७ वर्षीय महिलेला बाणावली समुद्रकिनाऱ्यावर वाचवण्यात आले, ती फ्लॅश रिप करंटमध्ये अडकली होती. हे पाहताच जीवरक्षक गुतेश गावकर यांनी तिच्याशी धाव घेतली, ती पुन्हा उठण्यासाठी धडपडत होती, अशा अवस्थेत तिला रेस्क्यू ट्यूबचा वापर करून वाचवण्यात आला.

 

तसेच कोलवा विचवार एक आत्महत्येच्या प्रयत्न्यात असलेल्या युवकाला वाचवण्यात आले. ह्या युवकांच्या आपल्या आत्महत्येची योजना गस्त घालणाऱ्या शंकर पर्येकर या जीवरक्षकाला सांगितली, पर्येकर यांनी त्याला शांत करून जवळच्या टॉवरवर नेले आणि पाणी दिले. नंतर पर्येकर यांनी  पोलिसांना बोलावले आणि ते येईपर्यंत त्या व्यक्तीसोबत राहिला.

 

पालोळे समुद्रकिनाऱ्यावर, २४ वर्षीय हैद्राबाडी युवक  किनारपट्टीपासून सुमारे ७०० मीटर अंतरावर कयाकिंग करत असताना त्याच्या कयाकमध्ये गळती झाल्याने बुडण्याचा धोका होता, हे कळल्यानंतर  एका सतर्क जेट स्की ऑपरेटरला सावध करण्यात आले आणि त्याला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले.

 

कोला नदीवर नोंदवलेल्या अशाच एका घटनेत, बेंगळुरूमधील दोन पुरुष, दोघेही वयाने ३२, कायाकिंग करताना त्यांचे कयाक पाण्यात उलटले, जीवरक्षक महेश वेळीप याने सर्फबोर्डच्या मदतीने पाण्यात धाव घेत त्यांना वाचवले.

 

बायणा समुद्रकिनाऱ्यावर पोहताना बेंगळुरू येथील एका १९ वर्षीय व्यक्तीच्या डाव्या पायाला तुटलेल्या काचेतून खोल जखम झाला, तर दुसऱ्या बाझुने हार्मल येथे केरळमधील एका व्यक्तीचा डावा हात निखळला. दोघांनाही प्राथमिक उपचार मिळाले. त्यांना त्यांच्याच वाहनाने निघायचे होते आणि त्यांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींच्या ताब्यात देण्यात आले.

कोलवा किनाऱ्यावर एक मूल हरवण्याची प्रकरण घडले होते, पालक पोहण्यात व्यस्त होते, एक जीवरक्षकाला त्रस्त बालक समुद्रकिनाऱ्यावर भटकताना दिसले, त्यांनी लगेच  जीपमधून घोषणा दिल्या. पालक सापडल्यानंतर आणि त्यांची ओळख पटल्यानंतर मुलाला ताब्यात देण्यात आले.

Trending

Exit mobile version