गोवा खबर

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट – 2024 चे चौथे पर्व 3 आणि 4 एप्रिल रोजी होणार पणजीत

Published

on

Spread the love

 

 

 गोवा खबर: गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस यांनी संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत, गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट – 2024 संबंधी माहिती दिली. यावेळी पर्यटन समिती सदस्य श्री. मार्क मेंडिस, श्री. अर्नेस्ट डायस, श्री. कार्लोस डिसूझा आणि ट्रॅवल आणि टुरिजमचे अध्यक्ष श्री. निलेश शाह उपस्थित होते. गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टचे 4थे पर्व 3 आणि 4 एप्रिल 2024 पासून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. हा कार्यक्रम 3 ते 9 एप्रिल 2024 दरम्यान आभासी पद्धतीने देखील आयोजित केला जाणार आहे. जगभरातील उद्योजक, भागधारक आणि पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यक्ती या कार्यक्रमात सामील होण्याची शक्यता आहे.

 

`गोवा: सूर्य, वाळू आणि समुद्राच्या पलीकडे असणाऱ्या पुनर्संचयित पर्यटनावर लक्ष केंद्रित करणारे पहिले राज्य’ या विषयावरील परिसंवाद हे गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट 2024 चे ठळक वैशिष्ट्य आहे. समुद्रकिनाऱ्या पलीकडील गोवा, नवीन पर्यटनाचा दृष्टिकोन, गोवा पर्यटनातील विविधता, भविष्यातील वाटचाल, खासगी क्षेत्राचे योगदान आणि सार्वजनिक खासगी भागीदारी यांसारख्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. हा परिसंवाद गोवा आणि त्यापलीकडे पर्यटनाच्या शाश्वत विकासाला चालना देणारे अर्थपूर्ण संवाद आणि सहयोग सुलभ करण्यासाठी गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे.

Goa Tourism Department
पर्वरीत आज शिगमोत्सव!

गोवा पर्यटन विभागाचे संचालक श्री सुनील अंचिपाका, आयएएस, यांनी सांगितले की “गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (GITM) हे गोव्याच्या प्रवास आणि व्यापार प्रदर्शनाचे शिखर आहे, जे आमच्या गोव्याला जागतिक पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेण्याची एक महत्त्वाची संधी दर्शवते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून गोव्याची अफाट क्षमता ओळखून, आम्ही बहुआयामी विकास उपक्रमांचा समावेश असलेल्या धोरणात्मक दृष्टिकोनाचा अवलंब करण्यास कटीबद्ध आहोत. व्यापार प्रदर्शकांच्या भरघोस उपस्थितीसह, गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (GITM) 2024 हे अभूतपूर्व यशाचे वचन देते, फलदायी सहभाग आणि भागीदारीसाठी भरपूर संधी देतात. व्यापार प्रदर्शनांना पूरक म्हणजे उद्योगक्षेत्रातील दिग्गजांनी आयोजित केलेल्या ज्ञानाची देवाणघेवाण करणारी चर्चा सत्रे, जी उपस्थितांना अमूल्य अंतर्दृष्टी आणि कौशल्य प्रदान करतात.”

 

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (GITM) 2024 पर्यटन उद्योगात एक गेम-चेंजर बनण्याचे वचन देते, जे सहभागींना अत्याधुनिक ट्रेंड, नवकल्पना आणि व्यवसाय संधींशी संलग्न होण्याची अनोखी संधी देते. पुनर्संचयित, अध्यात्मिक आणि अंतर्देशीय पर्यटनावर लक्ष केंद्रित करून, गोव्याच्या पर्यटनाची व्याख्या पुनर्परिभाषित करणे आणि शाश्वतता  आणि सर्वसमावेशकतेसाठी नवीन मानके प्रस्थापित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (GITM) 2024 ने गोव्यातील प्रमुख विक्रेत्यांसह पर्यटन उद्योगातील 15 हून अधिक  क्षेत्रांमध्ये 250 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचा समावेश असलेले दालन सादर केले आहे. गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (GITM) 2024 जगभरातील खरेदीदार आणि अभ्यागतांना उद्योग व्यावसायिकांच्या विविध श्रेणींशी जोडण्याची संधी देते, ज्यात गंतव्य व्यवस्थापन कंपन्या, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, मिटिंग्ज, इंसेंटीव्हज, कॉन्फ्रेंसेस, एक्झिबिशन्स(MICE) विशेषज्ञ आणि बरेच काही समाविष्ट आहे. हे जागतिक प्रेक्षकांसाठी उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी एक मंच प्रदान करते.

 

व्यावसायिक क्रियाकलाप आणि व्यापार भागीदार आणि प्रभावशाली उद्योग सहकाऱ्यांसह करारावर स्वाक्षऱ्यांद्वारे वाढ आणि सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधता येऊ शकतात. तज्ज्ञ व्यक्तींच्या नेतृत्वाखालील सत्रे, कार्यशाळा आणि परिसंवादामधून मौल्यवान माहिती मिळवता येईल, शाश्वत पर्यटन पद्धतींपासून ते उदयोन्मुख बाजारपेठेतील ट्रेंडपर्यंत विस्तृत विषयांचा समावेश असेल.

 

आभासी 3डी इमर्सिव्ह प्लॅटफॉर्मचा जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जाईल आणि प्रतिबद्धता आणि परस्परसंवाद वाढवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये सादर केली जातील. री-स्ट्रीम, बिझनेस कार्ड एक्सचेंज, प्रोडक्ट व्हिडिओ शोकेस, डिजिटल ब्रोशर स्टँड, बूथ सेटअपसाठी एक्झिबिटर ऍक्सेस, एक्झिबिटर ॲनालिटिक्स डॅशबोर्ड, बूथ मायक्रो वेबिनार पर्याय आणि अशा बऱ्याच काही तांत्रिक प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सिस्टमवर जोडले जाऊ शकतील.

 

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट हे बदलासाठी एक उत्प्रेरक आहे, अधिक शाश्वत आणि सर्वसमावेशक पर्यटन उद्योगाकडे परिवर्तन घडवून आणत आहे. गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (GITM) 2024 वर नोंदणी करा आणि गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने या रोमांचक प्रवासाचा एक भाग व्हा.

Trending

Exit mobile version