गोवा खबर:परराष्ट्र मंत्रालयाच्या ओई आणि पीजीई विभागाने परदेशातील भरतीसाठी एजंट्सकडून जादा शुल्क आकारणे, बनावट परदेशातील नोकऱ्या देणे आणि बेकायदेशीर भरती करणे यावर आदेश जारी केला आहे ज्यामध्ये असे नमूद केले आहे की नोंदणी नसलेल्या भरती एजंट्सद्वारे फसवणूक केल्या जाणाऱ्या परदेशी नोकरी शोधणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. खोट्या नोकरीच्या ऑफरद्वारे २-५ लाख रूपये शुल्क आकारले जाते. हे नोंदणी नसलेले, बेकायदेशीर एजंट परराष्ट्र मंत्रालयाकडून परवाना न घेताच काम करतात ही परवानगी परदेशात कामासाठी कोणत्याही भरतीसाठी अनिवार्य आहे. अनेक बेकायदेशीर एजंट फेसबुक, व्हॉट्स ॲप, टेक्स्ट मेसेज आणि अशा इतर माध्यमांतून काम करीत असल्याची माहिती आहे.
या एजन्सी त्यांचा ठावठिकाणा आणि संपर्कांबद्दल फार कमी किंवा कोणतेही तपशील प्रदान करतात. ते सहसा फक्त वॉट्स एपव्दारेच संप्रेषण करतात, ज्यामुळे कॉल करणाऱ्यांचे स्थान आणि ओळख आणि जॉब ऑफरची वास्तविकता निश्चित करणे कठीण होते. असे एजंट कामगारांना कठीण आणि जीवघेण्या परिस्थितीत काम करण्याचे आमिष दाखवितात. अनेक पूर्व युरोपीय देश, काही आखाती देश, मध्य आशियाई देश, इस्रायल, कॅनडा, म्यानमार आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकमध्ये काम करण्यासाठी भरतीसाठी अशी प्रकरणे नोंदविली जात आहेत.
परदेशी नियोक्ता, रिक्रूटमेंट एजंट आणि स्थलांतरित कामगार यांनी रीतसर स्वाक्षरी केलेल्या रोजगार करारासह वैध नोकरीच्या ऑफर येतात. रोजगार करारामध्ये नोकरीच्या अटी आणि शर्तींचा उल्लेख करणे तसेच पगार आणि इतर वेतन नमुद करणे आवश्यक आहे. वैध जॉब ऑफरने कामगारांना रोजगार किंवा वर्क व्हिसा किंवा पर्यटन व्हिसा वगळता इतर तत्सम व्हिसाच्या जोरावर स्थलांतर करण्याची परवानगी दिली पाहिजे. हे नोंद घ्यावे की पर्यटक व्हिसा केवळ पर्यटनाच्या उद्देशाने वापरला जावा. सामान्यतः, प्रतिष्ठित परदेशी नियोक्ते विमान भाडे, निवास आणि विमा संरक्षणाची रक्कम प्रदान करतात.
स्थलांतरित कामगारांना देशाच्या स्थानिक परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. प्रवासी कामगारांसाठी प्रवासी भारतीय विमा योजना खरेदी करणे भारत सरकारने नोंदणीकृत भरती एजंटना बंधनकारक केले आहे जे विविध फायदे प्रदान करतात. मृत्यू प्रकरणे आणि कामाशी संबंधित दुखापती आणि वैद्यकीय खर्चासाठी १० लाख विम्याची रक्कम एका वेळेच्या प्रीमियमसह (दोन वर्षांसाठी रु. २७५ आणि तीन वर्षांसाठी रु. ३७५).
परदेशात नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना फक्त नोंदणीकृत रिक्रूटमेंट एजंटच्या सुरक्षित आणि कायदेशीर सेवा वापरण्याची विनंती केली जाते. सर्व नोंदणीकृत रिक्रूटमेंट एजंटला एक परवाना क्रमांक जारी केला जातो जो ठळकपणे त्यांच्या कार्यालयाच्या आवारात आणि वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियासह त्यांच्या जाहिरातींमध्ये प्रदर्शित केला जातो. संभाव्य स्थलांतरितांनी अधिक माहितीसाठी www.emigrate.gov.in या सरकारी वेबसाइट भेट देऊन वास्तविकता तपासण्याचा सल्ला दिला जातो. भरतीच्या इतर कोणत्याही माध्यमातून परदेशात जाण्यामध्ये पैशाची फसवणूक होण्याचा, वचन दिलेल्या नोकरीत न उतरण्याचा आणि परदेशात राहण्याची कठीण परिस्थिती यांचा गंभीर धोका असतो. नोंदणी नसलेल्या सर्व एजन्सींना परदेशातील भरती उपक्रमात सहभागी न होण्याचा इशारा दिला जात आहे. अशा प्रकारची कामे स्थलांतरित कायदा १९८३ चे उल्लंघन करणारी आहेत आणि तो एक दंडनीय फौजदारी गुन्हा आहे.