गोवा खबर

उध्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाकडून एसएमई आयपीओवर कार्यशाळेचे आयोजन

Published

on

Spread the love

 गोवा खबर:उध्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालय आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि गोवा स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वेर्णा येथे एसएमई आयपीओ-प्रॉमिसिंग ॲव्हेन्यू ऑफ फंड उभारणी या विषयावर संवादात्मक कार्यशाळेचे आयोजन केले होते.

गोवा राज्य उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रविमल अभिषेक, आयएएस यांनी राज्यातील उद्योगांच्या वाढीला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. सरकारने उद्योग क्षेत्रातील विविध प्रक्रिया सुलभ केल्या आहेत ज्यामध्ये गुंतवणुकदारांना गोव्यात पारदर्शकता आणि व्यवसाय करण्याची सुलभता अनुभवता येईल असे ते म्हणाले. उद्योग खात्याने लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक भरभराटीसाठी उत्कृष्ट नियम आणि मदत केली आहे.

श्री. अभिषेक यांनी एसएमई-आयपीओवरील अशा कार्यशाळेमुळे स्थानिक उद्योग आणि एसएमईंना शेअर बाजारातून निधी उभारून त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रेरणा मिळेल असे सांगितले.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास धेंपो यांनी एमएसएमई क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे त्यामुळे एसएमईची मानसिकता बदलली पाहिजे आणि त्यांनी एसएमई आयपीओमध्ये प्रवेश केला पाहिजे असे सांगितले. गोव्यातील उद्योजकांना त्यांच्या कंपन्यांसाठी मोठी उद्दिष्टे ठरवावी लागतात आणि शेअर बाजारात संधी शोधाव्या लागतात असे ते म्हणाले.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. हरीश आहुजा आणि एनएसईचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. गगनदीप सिंग यांनी एसएमई आयपीओवर तपशीलवार सादरीकरण केले.          जीएसआयएचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध धेंपो यांचेही यावेळी भाषण झाले.

Trending

Exit mobile version