गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असेल. निवडणुकीसंबंधी कोणतीही तक्रार संबंधित विधानसभा मतदारसंघ आणि तालुक्यांसाठी खालील क्रमांकावर नोंदविता येईल.
फोंडा, शिरोडा आणि मडकई विधानसभा मतदारसंघासाठी फोंडा तालुका २३१२१२१ / ८७६६५६३७०० येथे नियंत्रण कक्ष; मुरगाव तालुका मुरगाव, दाबोळी आणि कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघासाठी नियंत्रण
कक्ष २५१३०१४ / ८७९३०४३०१४; नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळी आणि वेळ्ळी विधानसभा मतदारसंघासाठी सासष्ठी तालुका २७९४१०० / ९३०७२०५७६९ येथे नियंत्रण कक्ष. जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर हाच नियंत्रण कक्ष दक्षिण गोवा जिल्ह्यासाठीही असेल; केपे आणि कुडचडे विधानसभा मतदारसंघासाठी केपे तालुका नियंत्रण कक्ष २६६२२२८ / ९५८८४२७३३६; धारबांदोडा तालुका येथील सांवर्डे विधानसभा मतदारसंघ नियंत्रण कक्ष २६१४१११ / ९३५६८९४५४१; सांगे विधानसभा मतदारसंघासाठी सांगे तालुका नियंत्रण कक्ष २६०४२३२ / ७८२२०६९०६७; काणकोण विधानसभा मतदारसंघासाठी काणकोण तालुका नियंत्रण कक्ष २६४३३२९ / ९५२९०५०३५१ वर नमूद केलेले लँडलाइन, मोबाइल आणि व्हॉट्सॲप क्र. संबंधित विधानसभा मतदारसंघ आणि तालुक्यांसाठी आहेत. तसेच १९५० हा टोल फ्री क्रमांक राज्य पातळीवर कार्यरत असेल .