गोवा खबर:भारतीय राष्ट्रीय शालेय स्पर्धा महासंघाने बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण, बिहार पाटणा यांच्या सहकार्याने कंकरबाग, पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा प्रकल्पात १७ वर्षाखालील मुले आणि मुलीची ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा ऍथलेटिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने दिली आहे. ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा ऍथलेटिक स्पर्धेसाठी गोवा राज्य संघाची निवड करण्यासाठी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे २२ मार्च २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता कुजिरा बांबोळी येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
इच्छुक खेळाडूंनी एपीईओ श्री. पांडुरंग नाईक यांच्याशी फोन क्र. ८८३०६८१५५८ किंवा ऍथलेटिक प्रशिक्षक श्री. पी डी शशी कुमार यांच्याशी फोन क्र.. ९८९०३६१२६१ वर संस्थेच्या प्रमुखांनी स्वाक्षरी केलेले ओळखपत्र आणि योग्य किटसह संपर्क साधावा.