गोवा खबर

बीएसएनएल गोव्याने 25,000 एफटीटीएच ग्राहकांचा यशस्वी टप्पा केला पार

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्यात 25,000 फायबर-टू-द-होम (एफटीटीएच) ग्राहकांचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्याची घोषणा बीएसएनएलने केली आहे. अतिजलद इंटरनेट सेवेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बीएसएनएल गोव्याने आपल्या एफटीटीएच नेटवर्कच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी सातत्याने गुंतवणूक केली आहे. बीएसएनएलने या उल्लेखनीय यशाचे श्रेय कंपनीच्या तांत्रिक उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांसह ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाला दिले आहे. 

25,000 एफटीटीएच ग्राहकांचा टप्पा पार केल्याचे यश साजरे करताना आम्हाला आनंद होत आहे असे दूरसंचार विभागाचे गोव्यातील प्रधान महाव्यवस्थापक श्री. एस. के. चौधरी म्हणाले.” हा मैलाचा दगड गोव्यातील घरांमध्ये उच्च दर्जाच्या ब्रॉडबँड सेवा पोहोचवण्याच्या आमच्या अतूट वचनबद्धतेचा पुरावा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, मजबूत पायाभूत सुविधा आणि ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आम्हाला वेगवान इंटरनेट जोडणीसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान मिळाले आहे असे त्यांनी सांगितले.

एका विशेष मोहिमे अंतर्गत, सर्व वैयक्तिक ग्राहक आणि उद्योग व्यावसायिक ग्राहकांसाठी त्यांच्या लँडलाइन निर्देशकांमध्ये कोणताही बदल न करता आणि कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तांब्याच्या जोडण्यांचे फायबरमध्ये रूपांतर केले जात आहे. एफटीटीएचसाठीचे दर सर्व नागरिकांच्या गरजा पूर्ण होतील हे लक्षात घेऊन तयार केले आहेत, निवडक योजनांसाठी फ्री-टू-एअर टीव्ही वाहिन्या आणि ओटीटी ॲप्स, एफटीटीएच सह प्रदान केले जात आहेत.

बीएसएनएल, एफटीटीएच सेवेचे काम एक ठराविक निश्चित मोबदला देण्याच्या तत्वावर देण्यासाठी

शेवटच्या घटकापर्यंत पोहचू शकणाऱ्या दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदाते (टीआयपी) यांची भागीदार म्हणून नियुक्ती करत आहे.

सध्या, आयटीआयधारक पदवीधर, स्टार्टअप, बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती, व्यावसायिक किंवा वैयक्तिक व्यक्ती, टीआयपी/बीएसएनएल भागीदार होण्यासाठी अर्ज करू शकतात.

दूरसंचार पायाभूत सुविधा बळकट केल्या जातील

बीएसएनएल गोव्याने, गोव्यातील दूरसंचार सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी, दूरसंदेश वहनासाठी सक्षम संरक्षित मार्ग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नवीन बॅटरी, ऊर्जा प्रकल्प, सीयूपीएस बीएनजी, एमएएएन उपकरणे, सुपर एज आणि कोर राउटर इत्यादींमध्ये बीएसएनएल मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. गोव्यातील रहिवाशांना आणि व्यवसायांना अखंडित आणि विश्वासार्ह संपर्क व्यवस्था प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

नव्याने स्थापित संरक्षित मार्ग सध्याच्या दूरसंचार पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी तयार केले गेले आहेत. यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतही दूरसंदेश वहनचा अखंड प्रवाह सुनिश्चित होतो. नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक त्रुटी किंवा कोणत्याही अनपेक्षित घटनांमुळे होणाऱ्या संभाव्य अडथळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी या मार्गांची धोरणात्मक अंमलबजावणी केली जात आहे.

याव्यतिरिक्त, गोव्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या पलीकडे एलडी ओएफसी तारा खंडीत होण्यामुळे विलंब होण्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही महिन्यांत मुंबई ते गोव्यापर्यंत सर्व नवीन केआरसीएल डार्क फायबर उपलब्ध केले जातील. स्थानिकदृष्ट्या भिन्न संस्थितीद्वारे आणखी एक 10जी लिंक देखील स्थापित करण्यात आली आहे.

 

 

Trending

Exit mobile version