गोवा खबर:डेहराडून उत्तराखंड येथील राष्ट्रीय भारतीय लश्कर महाविद्यालयांमध्ये ८वी इयत्ता वर्ग प्रवेशासाठी इयत्ता ७ वीच्या वर्गात शिकणारी किंवा इयत्ता ७ वी उत्तीर्ण मुला आणि मुलींकडून अर्ज मागविले आहेत प्रवेश परीक्षा संबंधित राज्यांतील निवडक केंद्रांवर १ जून २०२४ रोजी होणार आहे.
प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांचे वय साडेअकरा ते तेरा वर्षे असावे, म्हणजे उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २०१२ अगोदर आणि १ जुलै २०१३ नंतर झालेला नसावा.
माहिती पुस्तिका तथा विहित नमुन्यातील अर्ज आणि जुन्या प्रस्नपत्रिकांची पुस्तिका राष्ट्रीय भारतीय लश्कर महाविद्यालयाच्या www.rimc.gov.in. या वेबसाईटवर आवश्यक शुल्क भरून ऑनलायन मिळवावे. राज्य सरकारकडून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२४ अशी आहे.