गोवा खबर

कायदा मंत्र्यांचे कायदा पदवीधरांना सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर:कायदा आणि न्यायमंत्री श्री आलेक्स सिक्वेरा यांनी अतिदुर्गम भागातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचणे ही देशाची मोठी सेवा आहे असे प्रतिपादन भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने भारत सरकारच्या कायदा व न्याय मंत्रालयाच्या न्याय खात्या अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय ‘हमारा संविधान हमारा  सन्मान’च्या  उद्घाटनप्रसंगी केले. 

टेली-लॉ सेवा ( https://www.tele-law.in ) आणि ऑनलाइन आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्सवर उपलब्ध असलेल्या ई-कोर्ट सेवांबद्दल बोलताना श्री सिक्वेरा यांनी “नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायदेशीर सल्ला मिळविण्यात अशा सेवा मदत करण्यात महत्त्वाची भूमिका  करतात असे सांगितले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वकील, कायद्याचे विद्यार्थी आणि कायदा संबंधितासमोर  बोलताना श्री सिक्वेरा यांनी “भारताच्या संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे असे सांगितले. सामान्य माणसाला मदत करणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही समाधान देणारी सेवा आहे असे ते म्हणाले. पैशाला प्राधान्य देऊ नका, सर्वसामान्यांचा विचार करा, असे आवाहन त्यांनी वकिलांना केले. “आपण एकत्र चालुया आणि गोव्याला एक चांगले निवासस्थान बनवूया,” असे ते म्हणाले, “सरकार कायदेशीर सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व सहकार्य उपलब्ध करील असेही ते म्हणाले.

‘हमारा संविधान हमारा सन्मान अभियान’ चे मुख्य आकर्षण म्हणजे जनसेवा जनता के द्वार, नागरिक केंद्रित सेवा मेळा आणि कार्यशाळा.

यावेळी उपस्थित होत्या सदस्य सचिव, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव, श्रीमती. विजया आंब्रे, कॉमन सर्व्हिसेस सेंटर (सीएससी) गोव्याचे राज्य प्रमुख, धवल जाधव, व्हीएम साळगावकर कायदा महाविध्यालयाचे प्राचार्य, डॉ. जी. शाबेर अली व इतर उपस्थित होते.

Trending

Exit mobile version