गोवा खबर

प्रश्नमंजुषा स्पर्धेत केपे महाविद्यालय प्रथम

Published

on

Spread the love

शिवजीजयंती निमित्त  माहिती खात्यातर्फे आयोजन

गोवा खबर:केपे येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे १९ फेब्रुवारी रोजी फोंडा येथील फार्मगुडी येथे झालेल्या राज्यस्तरीय समारंभात मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आयोजित केलेल्या अखिल गोवा आंतरमहाविध्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविले. द्वितीय पारितोषिक सांखळी येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविध्यालयाने तर गोवा अभियांत्रिकी महाविध्यालय फार्मगुडी यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले. उत्तेजनार्थ पारितोषिके जीआर कारे कायदा महाविध्यालय मडगाव आणि डीसीटीच्या धेंपे कला व विज्ञान महाविध्यालय मिरामार यांना मिळाली.

         स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येकी रूपये. ७,५००  आणि रुपये ५००० आणि रूपये ३,००० अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके देण्यात आली. याशिवाय रूपये ५०० ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली.

        त्याचप्रमाणे शिवजयंतीनिमित्त हायस्कूल आणि उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर अखिल गोवा नाट्य प्रवेश स्पर्धाही घेण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून एकूण १८ शैक्षणिक संस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला. श्रीमती. आनंदीबाई एम.नाईक हायस्कूल कारंजाळे मडकईने प्रथम पारितोषिक पटकाविले. द्वितीय पारितोषिक एजे दी आल्मेदा हायस्कूल फोंडा आणि व्हीडीएसव्ही वागळे हायस्कूल मंगेशीने तृतीय पारितोषिक पटकाविले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रुपये १०,०००, ७,००० आणि रूपये ५,००० अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय रोख पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक श्रीमती. लीना एस. पेडणेकर, श्री. झिलू गावकर आणि कु. काजल चोडणकर होत्या.

         या दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना माहिती व प्रसिद्धी संचालक श्री. दिपक बांदेकर, माहिती अधिकारी श्री. प्रकाश नाईक, यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. श्री. प्रकाश नाईक, सहाय्यक माहिती अधिकारी श्री. किरण मुननकर आणि श्री शांतो नाईक आणि माहिती सहाय्यक श्री. सिद्धेश सामंत यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन सहायक माहिती अधिकारी श्री श्याम गावकर यांनी केले.

Trending

Exit mobile version