गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकारी तसेच दक्षिण गोवा जिल्हा नोंदणी प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी दक्षिण गोवा जिल्ह्यातील गोवा क्लिनिकल आस्थापना (नोंदणी आणि नियमन कायदा) कायदा २०१९ अंतर्गत नोंदणीकृत सर्व क्लिनिकल आस्थापनांना त्यांच्या क्लिनिकच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी ३१ मार्च २०२४ पूर्वी अर्ज करण्यास सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया पीसी-पीएनडीटी कक्ष, खोली क्रमांक ३२३, तिसरा मजला, माथानी साल्ढाना प्रशासकीय संकुल मडगाव येथे संपर्क साधावा.