गोवा खबर

गृहनिर्माण संस्थांना नोंदणी शुल्क, स्टॅम्प ड्युटी सवलतीसाठी ३१ मार्च पर्यंत मुदत वाढ

Published

on

Spread the love

गोवा खबर:गृहनिर्माण संस्थांना फ्लॅट किंवा प्लॉटची जमीन आपल्या संस्थेच्या नांवावर करून घेणे शक्य व्हावे म्हणून सरकारने नोंदणी शुल्क तसेच स्टॅम्प ड्युटयीत दिलेल्या विशेष सवलतीची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविली आहे.   फ्लॅट तसेच प्लॉटच्या विक्री व्यवहाराच्या नोंदणीसाठी १ टक्के शुल्क असेल. स्टॅम्प ड्युटी सुध्दा फक्त १ टक्के असेल. या विषयीची अधिसूचना सरकारने जारी केली आहे.

सरकारने योजनेची मुदत वाढविण्याबरोबरच नोंदणी शुल्क तसेच स्टॅम्प ड्युटी आकारण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.

संबंधित उपनिबंधकांच्या कार्यालयात १ ऑगस्ट २०२३ पासून तीन महिन्यांच्या आत विक्रीपत्राची नोंदणी केली आहे त्यानाच या  विशेष सवलतीचा लाभ मिळेल.

Trending

Exit mobile version