गोवा खबर

गोव्याच्या अनोख्या आणि पारंपारिक ‘कावी कलेस’ नवीन ओळख :राज्यपाल

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी ‘कावी कला’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोव्यातील चित्रकलेच्या अनोख्या आणि पारंपारिक तंत्राला नव्याने ओळख करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे असे सांगितले. भारताच्या पंतप्रधानांच्या पुढाकारांचा उल्लेख करताना राज्यपालांनी २०२१ मध्ये त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी या कलेला दिलेल्या महत्त्वाचा उल्लेख केला.

राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याच्या कावी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी अडवलपाल आणि डिचोलीला भेट दिली.

राज्यपालांच्या पत्नी श्रीमती. रीता श्रीधरन पिल्लई, राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस आणि माजी सचिव श्री मिहीर वर्धन यावेळी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना राज्यपालांनी गोव्यातील ‘कावी कला’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रकलेचे अनोखे आणि पारंपारिक तंत्र गोव्यातील बहुतेक मंदिरे, चर्चमध्ये पाहिले जाते आणि ते अतिशय महत्त्वाचे आहे असे सांगितले.

Goa Tourism Department
#ADVt गोव्यात आज पासून किंग मोमोची राजवट.. आज पासून कार्निव्हलची सुरुवात.. पर्वरी येथे आज कर्टन रेझर..!

कावी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोव्यातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राजभवनतर्फे १४ ते १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत नवीन दरबार हॉल, राजभवन ऍनेक्सी येथे चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राज्यपालांनी दिली.

ही कार्यशाळा राजभवनद्वारे वारसा प्रेमींनी या अनोख्या ‘कावी कलेचे’ संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि या कलेबद्दल उर्वरित देश आणि जगामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. गोव्याचा वारसा असलेली ही समृद्ध, सुंदर आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक जडणघडण पर्यटकांसाठीही आकर्षण ठरू शकते आणि सर्व संबंधितांनी त्याचा जोमाने प्रचार केला पाहिजे असे आवाहन राज्यपालांनी केले.

राज्यपालांनी भेट दिलेल्या गावाच्या सौंदर्यावर बोलताना याचे कौतुक करावे लागेल असे सांगितले. लवकरच पूर्ण होणाऱ्या त्यांच्या हेवन्ली आयलॅड ऑफ गोवा या नवीन पुस्तकाचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले गोव्याची परंपरा पुढे आणून भारताच्या इतर भागांना दाखविली पाहिजे.

श्री शर्वाणी मंदिरात त्यांचे आगमन होताच आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी सरपंच श्री गजानन पालकर, जि.प.सदस्य श्री प्रदिप रेवोडकर, श्री शिवानंद शेणोई साळगावकर व देवस्थानचे सदस्य व इतर उपस्थित होते. समितीच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

श्री शर्वाणी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर राज्यपालांनी अडवलपालचे गावातील श्री हनुमान मंदिरात कावी कलेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पंचायत कार्यालयाला भेट दिली. सरपंच, उपसरपंच व इतर सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यपालांनी लामगाव, डिचोली येथील श्रीं आनंद देसाईंच्या हेरिटेज हाउसलाही भेट दिली. त्यांच्या निवासस्थानी सुंदर पारंपारिक कावी कला त्यांनी पाहिली.

Trending

Exit mobile version