गोवा खबर

गोव्यात पर्यावरणाभिमुख उद्योग आणण्यासाठी विविध उपक्रम: गुदिन्हो

Published

on

Spread the love


गोवा खबर: उद्योगमंत्री श्री. माविन गुदिन्हो यांनी गोव्यात पर्यावरणाभिमुख उद्योग आणण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. वेर्णा येथील औद्योगिक वसाहत येथे पेर्लॉन गोवा फिलामेंट कंपनीच्या औद्योगिक प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

श्री.गुदिन्हो यांनी गोव्याला अधिक रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक विकासाची गरज आहे, परंतु त्याचवेळी या सौदेबाजीत आपल्या पर्यावरणाची हानी होणार नाही हे पाहावे लागेल. त्यामुळे पर्यावरणपूरक उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यावर सरकार भर देत आहे असे त्यांनी सांगितले.
राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणूकदारांना सोयीस्कर बनविण्यासाठी, व्यावसायिक कार्य सुलभ करण्यास सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

#ADVT विकसित भारत;विकसित गोवा 2047!

श्री. गुदिन्हो यांनी औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी गोव्यातील तरुणांना कौशल्य वाढविण्यावर भर दिला. स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्यात म्हणून बाहेरील राज्यातून मनुष्यबळ वापरण्याची पद्धत कमी करावी लागेल असे ते म्हणाले.

त्यांनी पेर्लॉन गोवा फिलामेंट कंपनीला त्यांच्या नवीन प्रयत्नासाठी शुभेच्छा दिल्या.

पर्यावरण मंत्री श्री. आलेक्स सिक्वेरा यांनी औद्योगिक वसाहत, वेर्णा येथे युनिट स्थापन करण्यासाठी पेर्लॉन गोवाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
गोव्यातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छ आणि हरित उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार सातत्याने कठोर प्रयत्न करीत आहे असे श्री. सिक्वेरा म्हणाले.

पेर्लॉन गोव्याचे सल्लागार श्री. सुदिन नाईक यांचे यावेळी भाषण झाले. सेराफिन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. फिलिप हेंडल, एमडी श्री. कामिल ग्र्झलेक, एमडी श्रीमती. मेघा कपूर, सीईओ श्री. फ्लोरियन किसलिंग, पेर्लॉन गोवाचे सीईओ श्री. बर्नहार्ड सेहमिट, सीएफओ श्री. दीपक कुमार व इतर उद्घाटन समारंभास उपस्थित होते.

Trending

Exit mobile version