गोवा खबर:मत्स्योध्योग, पशुसंवर्धन आणि पशुचिकीत्सा सेवा मंत्री, श्री निळकंठ हळर्णकर यांनी कांपाल येथील खुल्या मैदानावर एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलमध्ये बिझनेस-टू-बिझनेस स्टॉल, मत्स्यालय गॅलरी आणि परिषदेचे उद्घाटन केले.
यावेळी बोलतान मंत्र्यांनी स्थानिकांना व्यवसायात सहभागी होण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले.
#ADVT विकसित भारत;विकसित गोवा 2047!
मासेमारी नैसर्गिकरित्या शाश्वत पद्धतीने व्हावी आणि मासळीची निर्यात आणि स्थानिक वापर यांच्यातील समतोल राखण्यासाठी सरकार पावले उचलत आहे असे त्यांनी सांगितले. पुढे बलताना श्री.हळर्णकर यांनी ‘विकसित भारत’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मासेमारी आणि संबंधित कार्यक्रमामध्ये सुधारणा करीत आहेतज्यामुळे गोव्यातील अधिकाधिक तरुण या क्षेत्रात रोजगार पुरवठादार बनतील असे सांगितले.या क्षेत्रात अधिकाधिक शैक्षणिक अभ्यासक्रम आणून या उद्योगातील आणि त्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी सरकार तयार आहे आणि त्यासाठी सदर संचालनालय लोकांच्या सूचनांसाठी सदैव खुले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरवातीस मत्स्यव्यवसाय संचालनालयाच्या संचालिका, डॉ शमिला मॉन्तेरो यांनी आपल्या स्वागतपर भाषणात या महोत्सवामुळे शैक्षणिक हेतू साध्य होईल आणि मत्स्यपालनात करिअर शोधण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना, विशेषत: तरुणांना दिशा मिळेलअशी आशा व्यक्त केली.
यावेळी मत्स्यव्यवसाय संचालनालयाचे सचिव श्री सरप्रीत सिंग गिल, आयएएस, तज्ञ पॅनेल, व इतर उपस्थित होते.