आजारा विषयी जागरुकता निर्माण करुन कॅन्सरच्या रुग्णांना सहकार्य करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन
गोवा खबर: मणिपाल हॉस्पिटल (एमएच) गोवा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गोवा च्या राज्य शाखे तर्फे एकत्रितपणे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये कॅन्सर विषयी जागरुकता निर्माण करुन कॅन्सरचे निदान, त्याचा प्रतिबंध आणि उपचारांमधील दरी कमी करण्या विषयी भर देण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हॉस्पिटल ने या जीवघेण्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपली वचनबध्दतादर्शवली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयएमए गोवा राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. संदेश चोडणकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोव्यातील उपलब्ध उपचारांची दरी कमी करण्यासाठी हॉस्पिटल ने आपली वचनबध्दता दर्शवली. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मणिपाल हॉस्पिटल गोव्या तर्फे येथील डे केअर मध्ये कॅन्सर वर उपचार घेणार्या रुग्णांना प्रतिकात्मक विशेष अशी भेट देण्यात आली.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या माहितीनुसार, २०२२ मध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ही १४.६१ लाख होती ती वाढून २०२५ पर्यंत ही संख्या १५.७ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. कॅन्सर चे रुग्ण आणि प्रमुख पाहुणे डॉ. संदेश चोडणकर यांनी आपल्या प्रवासाबद्दल माहिती देऊन कॅन्सरच्या रुग्णांनी कॅन्सरशी लढा देण्याचा आपला अनुभव समोर मांडला.
यावेळी बोलतांना २०२४ करीता आयएमए गोवा राज्य शाखेचे असलेले अध्यक्ष डॉ. संदेश चोडणकर यांनी सांगितले “ कॅन्सरच्या विरोधात एकत्र येऊन आम्ही कॅन्सरशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि आयएमए गोवा राज्य शाखा ही नेहमी या भयानक आजाराशी लढा देण्यात सहकार्य करत असून यामुळे कॅन्सर रुग्णांमधील उपचारांची दरी कमी होऊ शकेल.” त्यांनी पुढे हे ही नमूद केले की आपण एकत्र येऊन कॅन्सरशी लढा देण्यासाठी एकत्र येऊन लोकांना प्रतिबंध, निदान आणि उपचारांवर भर देणे आवश्यक आहे. आजच्या जागतिक कर्करोग दिनी आपण सर्वांनी एकत्र येऊन या सल्ल्या बरोबरच दबाव कमी करुन जागरुकता निर्माण करुन शूरतेने लढणार्या रुग्णांना सहकार्य करणे आवश्यक आहे.”
डॉ. संदेश चोडणकरां सह हॉस्पिटल डायरेक्टर आणि युनिट हेड श्री सुरेंद्र प्रसाद, चीफ ऑफ ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट आणि सिनियर कन्सल्टंट ऑन्को सर्जन डॉ. शेखर सालकर, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजी डॉ. जेकब जॉर्ज, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजी डॉ. गुंजन बैजल, कन्सल्टंट हेमॅटो ऑन्कोलॉजी सह बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट विशेषज्ञ डॉ. महादेवा स्वामी , कन्सल्टंट ऑन्को सर्जन डॉ. श्रेधरन एम, कन्सल्टंट न्युक्लियर मेडिसिन, पेट सीटी आणि न्युक्लियरल थेरनॉस्टिक्स डॉ. पंजक म्हात्रे, मेडिकल सुप्रिंटेंडेंट डॉ. आदित्य गोसावी, मणिपाल हॉस्पिटल, गोव्याचे सेल्स आणि मार्केटिंग हेड श्री हरी प्रसाद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी एका हेल्थ टॉकचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ‘ ब्रेस्ट कॅन्सर ॲन ओव्हर व्ह्यू’ या विषयावर डॉ. शेखर सालकर यांचे भाषण झाले.
यावेळी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल्स गोव्या चे हॉस्पिटल डायरेक्टर आणि युनिट हेडश्री सुरेंद्र प्रसाद यांनी सांगितले “ एक उत्तम आरोग्य सुविधांसह प्रभाव पाडणार्या आरोग्य सुविधा देणार्या संस्थे बरोबर काम करतांना आंम्हाला आनंद होत आहे. आयएमए गोवा राज्य शाखे बरोबरच्या सहकार्याने समाजाच्या भल्यासाठी जागतिक कर्करोग दिना निमित्त काम करणे आनंददायी गोष्ट आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही कॅन्सरचा परिणाम कमी करुन महत्त्वपूर्ण जागरुकता निर्माण करत कॅन्सरशी लढा देत असलेल्यांना सहकार्य करत आहोत.”
मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि सिनियर कन्सल्टंट ऑन्को सर्जन डॉ. शेखर सालकर यांनी सांगितले “ कॅन्सरपासून मुक्ती मिळवलेल्या रुग्णांचा प्रतिकार हा मानवी क्षमतेचे द्योतक आहे. यावर्षी आम्ही केमोथेरपीच्या रुग्णांना भेटी दिल्या ज्यायोगे शरीराचेच नव्हे तर यातूनच हे प्रतीत होते की ते या प्रवासात एकटे नाहीत. आरोग्य सेवा प्रदाता आणि समाजाने एकत्र येऊन आपण सर्वजण बरे होऊन आशा निर्माण करत कॅन्सरने त्रस्त झालेले जीवन सुधारण्यात सहकार्य करु.”
डॉ. सालकर पुढे म्हणाले “ मणिपाल हॉस्पिटल्स गोवा हे गोव्यातील एकमेव सर्वसमावेशक कॅन्सर उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणारे केंद्र आहे.”
या कार्यक्रमाची सुरुवात आज रेडिएशन डिपार्टमेंट मधील रुग्णांनी केक कापून करण्यात आली. त्याच बरोबर आयोजक समिती ने डॉ. संदेश चोडणकर यांच्यस हस्ते केमोथेरपीचे उपचार घेत असलेल्या डे केअर मधील रुग्णांना भेटवस्तू दिल्या. त्याच बरोबर हॉस्पिटल तर्फे कॅन्सर अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन करुन यात डॉक्टर आणि रुग्ण दोघेही सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सांगता कॅन्सर रुग्णांचा गौरव करुन झाला आणि त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांना त्यांचे अनुभव कथन केले.