गोवा खबर

ज्येष्ठ प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा शिपयार्ड लिमिटेड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या अंतर्गत तिसवाडी सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी तीन दिवसीय वरिष्ठ प्राथमिक उपचार प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवारपासून मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सुरू झाला. शिक्षकांना आपत्कालीन परिस्थितींना कसे सामोरे जावे आणि कौशल्ये आत्मसात करण्याच्या अनेक सत्रांसह प्रथमोपचार कसे द्यावे हे शिकवले गेले.

सेंट जॉन ॲम्ब्युलन्सचे प्रमाणित प्रशिक्षक डॉ. जोर्सन फर्नांडिस या कार्यक्रमाचे संचालन करीत आहेत सदर कार्यक्रमाला शिक्षण संचालनालय आणि लायन्स क्लब ऑफ फोंडा यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, एचआर, हेड, जीएसएल, शशिकांत कांबळे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ वेदपाल तारी आदी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version