गोवा खबर

सिक्वेरा यांच्याहस्ते नुवे मतदारसंघात पाण्याच्या टाक्यांचे वितरण

Published

on

Spread the love


    गोवा खबर:  पर्यावरण मंत्री श्री. एलेक्सो सिक्वेरा यांनी आज आमदार एलएडी योजनेंतर्गत नुवे, माजोर्डा, उतोर्डा आणि कालाटा गावातील लोकांना पाण्याच्या टाक्यांचे वितरण केले. नुवे मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

नुवे मतदारसंघाच्या विकासासाठी विविध प्रयत्न सुरू असल्याचे सांगून श्री. सिक्वेरा यांनी गरजू लोकांना पाण्याच्या टाक्या वाटप केल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

सर्वसामान्यांच्या भल्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सरकारी उपक्रमांना जनतेने सहकार्य द्यावे असे आवाहनही मंत्र्यांनी केले. मुलभूत सुविधांशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यात आपला सहभाग राहील असे आश्वासन त्यांनी दिली.

मंत्री श्री. सिक्वेरा यांनी नुवे मतदारसंघातील लोकांना आधार कार्ड नोंदणी अद्ययावत करण्यासाठी नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड अद्ययावतीकरण शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.

    वेर्णा येथील ग्रामपंचायत सभागृहात आज झालेल्या या शिबिराला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशीच शिबिरे ३१ जानेवारी २०२४ रोजी ग्राम पंचायत सभागृह, लोटली येथे आणि १ आणि २ फेब्रुवारी २०२४ रोजी अनुक्रमे पलावरा डी जार्डिन हॉल, नुवे आणि ग्राम पंचायत सभागृह, नागोवा येथे आयोजित केली जातील.

Trending

Exit mobile version