गोवा खबर

भारत विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर : राज्यपाल

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी विश्वगुरू बनण्याचे भारताचे स्वप्न योग्य मार्गावर असल्याचा विश्वास व्यक्त केला. ताळगांव पठार येथील गोवा विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही उपस्थित होते.

या प्रसंगी शुभेच्छा देताना राज्यपालांनी आपल्या संविधानाला जागतिक स्तरावर सर्वमान्यपणे स्वीकारले आहे यावर भर दिला असल्याचे सांगितले. आपल्या समृद्ध परंपरांपासून प्रेरणा घेऊन जग आज भारताकडे कौतुकाने पाहते असे ते पुढे म्हणाले. राज्यपाल श्री. पिल्लई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली गोव्याचा झपाट्याने विकास होत असल्याचे सांगितले. गोवा हे भारतातील स्मार्ट राज्य म्हणून प्रगती करीत असून जीवनाच्या विविध पैलूंमध्ये प्रगती होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

नवीन झुआरी पूल, जी-२०चे यश, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात गोव्याचा आदर्श दर्जा आणि पर्पल फेस्टचे यशस्वी आयोजन यासारख्या अनेक विकासात्मक कामगिरीवर प्रकाश टाकून राज्यपालांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची हमी म्हणून नागरिकांच्या शाश्वत दक्षतेच्या महत्त्वावर भर दिला. .

राज्यपाल पिल्लई यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता सर्व लोकांना कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.

सुरवातीस राज्यपालांनी संचलनाची पाहणी केली. राजभवन येथील पोलीस अधिक्षक श्री विश्राम उमाकांत बोरकर यांना विशेष सेवेसाठी पोलीस राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय कार्मिक खात्याचे श्री. संजित रॉड्रिग्स, आयएएस, श्री. अजित रॉय, आयएएस , कु. स्वेतिका सचन, आयएएस, श्री. निधीन वालसन, आयपीएस, श्री. ओमवीर सिंग, आयपीएस, श्री. अभिषेक धनिया, आयपीएस, श्री. शिवेंदू भूषण, श्री. सौरभ कुमार, आयएफएस, आणि श्री. जॅबेस्टिन ए, आयएफएस यांना या प्रसंगी सरकार आणि सार्वजनिक सेवा वितरणातील उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेबद्दल मुख्यमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले .

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातर्फे गोमंतकीयांसह देशवासीयांना प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Vishwajit P RANE

गोवा पोलीस, गोवा वन, गोवा पर्यटन विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते आणि गोवा इलेक्ट्रिसिटी यासह विविध विभागातील पुरस्कार विजेत्यांना ३७ व्या राष्ट्रीय खेळ, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट आणि जी-२० सारख्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.

माहिती अधिकारी श्री ऑलवीन परेरा यांना राज्यात आयोजित केलेल्या जी-२० बैठकीदरम्यान त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार श्री सदानंद तानावडे, आमदार, मुख्य सचिव श्री पुनीतकुमार गोयल, आयएएस, श्री जसपाल सिंग, आयपीएस, डीजीपी गोवा व इतर मान्यवर उपस्थित होते.

दोनापावला येथील अवर लेडी ऑफ रोझरी हायस्कूल, यांना सर्वोत्कृष्ट मार्चिंगला पहिले स्थान मिळाले. वास्को येथील नेव्ही चिल्ड्रन स्कूलने दुसरे स्थान पटकाविले आणि तिसरे स्थान ओल्ड गोवा येथील ओल्ड गोवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने पटकाविले.

सशस्त्र गटातील सर्वोत्कृष्ट मार्च पास्टचा मान भारतीय लष्कराच्या तुकडीला मिळाला आणि निशस्त्र गटात गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या महिला दलाने उत्कृष्ट कामगिरी केली.

Trending

Exit mobile version