गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि ज्यांच्या संघर्षाने आणि बलिदानामुळे भारत स्वतंत्र देश झाला त्या सर्व महान आत्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात “दरवर्षी हा दिवस देशभरात देशभक्तीच्या भावनेने साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० साली लागू झालेल्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा हा दिवस स्मरण करतो आणि त्याने आपल्या देशाला सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनविले. हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या आपल्या देशाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. हे संविधान जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताचे सार वर्णन करते आणि त्याच्या सांस्कृतिक विविधतेवर समान जोर देते.

      पुढे गोव्यातील जनतेला संदेश देताना मुख्यमंत्री म्हणतात “प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या स्वातंत्र्यलढ्याची आणि आपल्याला पूर्ण स्वराज्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या महान स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. ज्यांनी आपली राज्यघटना घडविली त्या महान दिग्गजांचीही आठवण करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच प्रत्येक नागरिकाला आपल्या राज्यघटनेत दिलेले मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. आता आपल्याला राज्यघटनेने जपलेल्या मूल्यांचे रक्षण करण्याची गरज आहे.

      गोव्यातील जनतेने आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी आणि गोवा ही शांतता आणि समृद्धीची भूमी बनविण्यासाठी एकदिलाने काम करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री म्हणतात आमच्या सरकारने विकासाच्या दिशेने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सतत मार्गदर्शनाखाली “सबका साथ, सबका विकास” वर विश्वास ठेवणारे एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी पूर्ण समर्पणाने, गोव्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाचे वरदान पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आरोग्य आणि शिक्षण या सामाजिक क्षेत्रांना प्राधान्य देऊन, आम्ही रोजगार निर्मितीला महत्त्व देत आहोत आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ सारख्या कार्यक्रमातून उद्योजकतेची भावना रुजवित आहोत.

      आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या सर्व शूर सैनिकांचे आणि जगातील सर्वोत्तम संविधान देण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्याचे आभार मानून प्रजासत्ताक दिन साजरा करूया. सशक्त, अखंड भारत निर्माण करण्यासाठी आपण पुन्हा वचनबद्ध होऊया आणि सर्वांमध्ये शांतता, सौहार्द आणि बंधुभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करूया,” असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version