गोवा खबर

“रोजगार देण्यास गोवा सरकार अपयशी, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली”:मनोज परब

Published

on

Spread the love
गोवा खबर:बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप रेव्होलुशनरी गोवन्सचे अध्यक्ष तसेच आगामी लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी केला आहे. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यात सरकारच्या त्याच बरोबर गोव्याचे दोन्ही खासदार यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली असल्याचे सांगितले.
रेव्होलुशनरी गोवन्सने अनेकवेळा पत्रकार परिषद त्याचबरोबर आर.जी.चे आमदार विरेश बोरकर यांच्यामार्फत विधानसभा अधिवेशनात सुद्धा राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित केला आहे. बोरकर यांनी पहिल्याच विधानसभा अधिवेशनात महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना, गोवेकर कामगार आणि बिगर गोमंतकीय कामगार या प्रश्नावर मोन्सेरात यांनी माहिती गोळा केली जाणार असल्याचे सांगितले होते, परंतु आजपर्यंत ती मिळालेली नाही. केंद्रातील सर्वेक्षणातून गोवा राज्य हे बेरोजगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. जॉब फेअर सारखे कार्यक्रम आयोजित करून फक्त हे सरकार पब्लिसिटी स्टंट करत आहे. रोजगाराच्या घोषणाबाजी करून लोकांची फसवणूकच हे काँग्रेस बीजेपी सरकार करत आले आहे.

#Advt Event Schedule – International Purple Fest, 2024 -January 12, 2024
Purple Fest Goa @discommgoa @S_Phal_Dessai

निवडणुकावेळी रोजगार भरती जाहिरातबाजी करणे आवेदन मागविणे हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठीच असून आजपर्यंत गोवेकराना रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. गोवेकरानी फक्त अप्रेंटीशिप करावी आणि सरकारी त्याचबरोबर खासगी क्षेत्रात नोकऱ्या मात्र सरकारने परप्रांतीयांना द्यावा, हे चुकीचे असून, हे निष्काळजी, अकार्यक्षम सरकार गोवेकराना रोजगार देण्यात उदासीन असल्याचे मनोज परब म्हणाले.
राज्यातील हे डबल इंजिन सरकार, हे भाजप सरकार जातीपातीचे राजकारण करून गोवेकरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आले आहे. देवाच्या नावावरून घाणेरडे राजकारण सध्या सुरू असून, एकामेकाविरुद्ध भडकवण्याचे सत्र सध्या ह्या बीजेपी सरकारकडून सुरू आहे. राज्यात बेरोजगारी हा गंभिर विषय असून, गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक व फ्रान्सिस्को सार्दीन्ह हे दोन्ही हा विषय संसद मध्ये मांडण्यात अपयशी ठरले आहेत. आज राज्यातील बेरोजगारीविषयी कोणतीच पाऊले उचलताना हे सरकार दिसत नाही. केंद्रातून करण्यात आजेल्या सर्वेक्षणातून देशात गोवा राज्य हे बेरोजगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असतानासुद्धा हे निर्लज्ज सरकार आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी खोट्या विकासाच्या जाहिरातबाजी करत असल्याचे मनोज परब म्हणाले.
राज्यात बीजेपी सरकार बारा वर्षापासून असून, अजूनपर्यंत बेरोजगारी मिटविण्यासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलली नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेजारील राज्यामध्ये अनेक मालकी जमीन आहे, तिथे त्यांचे साटेलोटे असल्यामुळे तेथील लोकांना गोव्यात सरकारी त्याचबरोबर खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतात. आज गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असून सुद्धा गोव्यातील सुशिक्षित युवा वर्ग त्यामुळे बेरोजगार राहतो. आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे याविषयी चर्चा करणार असून येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा उचलून धरणार असून, यापुढे जनेतेने अशा अकार्यक्षम सरकारांच्या हातात सत्ता देऊ नये. गोवेकरविरोधी सरकारला थारा देऊ नये. गोवेकर गोवेकरांचे अस्तित्व त्यांचे विषय जसे विधानसभेत आर.जी. कडून मांडले जात आहेत, त्याचप्रमाणे संसदेत सुद्धा गोवेकरांचे मुद्धे गोवेकरांचा आवाज पोहोचणे गरजेचे असल्याचे मनोज परब म्हणाले.

Trending

Exit mobile version