गोवा खबर

‘एकोझ ऑफ अर्थ’च्या ग्रीन साईड मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Published

on

Spread the love

 

~एकोझ ऑफ अर्थच्या पुढाकाराने, ग्रीनर साइड मोहिमेमध्ये गोव्याच्या समृद्ध जैवविविधतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जानेवारीमध्ये कार्यशाळा आणि उपक्रमांचा समावेश

 

~ कार्यशाळा आणि उपक्रम पर्यावरण आणि संवर्धन क्षेत्रातील तज्ञांद्वारे आयोजित केले जातील आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी ते खुले राहणार आहे

 

गोवा खबर:नवीन वर्षाने गोव्यातील वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतूंच्या संवर्धनाबद्दल नव्याने जागरुकता आणली आहे. या जागृकतेअंतर्गत ग्रीनर साईड मोहीम आयोजित करण्यात आली आहे. महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात गोव्याच्या विविध परिसंस्थांमध्ये खारफुटी, मधमाश्या, ड्रॅगनफ्लाय, डॅमसेल्फी, फुलपाखरे आणि पक्षी यांसारख्या अनेकदा दुर्लक्षित केलेल्या घटकांचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. कार्यक्रमात विविध उपक्रम, माहितीसत्र आणि कार्यशाळा समाविष्ट आहेत.

 

‘एकोझ ऑफ अर्थ ओंसोम्बल ऑफ द वाईल्ड’ नावाच्या अलीकडील कार्यक्रमानंतर, ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. ग्रीनर साईड मोहिमेने पश्चिम घाट आणि गोव्यातील वैविध्यपूर्ण वन्यजीवांचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

या मोहिमेचे नेतृत्व ‘एकोझ ऑफ अर्थ’ या कार्यक्रमातून झाले असून ती पश्चिम घाटाला हायलाइट करण्यावर आणि गोव्यातील वैविध्यपूर्ण वन्यजीवांचे जतन करण्याबद्दल जागरूकता पसरविण्यावर लक्ष केंद्रित करते.

१३ जानेवारी रोजी, युवा संवर्धन कृती नेटवर्कमधील स्निग्धा सहगल गोवा राज्य जैवविविधता मंडळ कॅम्पस येथे कार्यशाळेचे नेतृत्व करेल. ‘सायन्स अँड स्टोरीटेलिंग इन नेचर्स लॅब’’ या शीर्षकाची ही कार्यशाळा आहे, यात कथाकथन, उपक्रम आणि प्रयोगांद्वारे सहभागींना निसर्गाबद्दल शिकवेल जाईल.

 

१४ जानेवारी रोजी, खोज आओ ही पदयात्रा होणार आहे, अ‍ॅडव्हेंचर्स गोवा ह्या संस्थेद्वारे ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे, जी निसर्ग प्रेमींसाठी ऑफबीट अनुभव क्युरेट करून त्यात निसर्ग जर्नलिंगचे बारकावेही शिकवले जातील, ही पदयात्रा  शिवोलीतील नदीच्या पायवाटेने होईल.

 

१८ जानेवारी रोजी मधमाशीपालनाची आवड असलेल्यांना मधमाशी पालन शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केली गेली आहे. या शैक्षणिक शो-अँड-टेल सत्राद्वारे मधमाशांचे महत्त्व, त्यांचे अधिवास, भूमिका आणि संवर्धन याविषयी माहिती दिली जाईल . ही कार्यशाळा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे असून विठ्ठल जोशी हे सत्र क्युरेट करतील.

 

१९  जानेवारी रोजी, पर्यावरणशास्त्रज्ञ पराग रांगणेकर करंबोळी तलावावर फेरफटका मारताना लोकांना ड्रॅगनफ्लाय आणि डॅमसेल्फीबद्दल शिकवतील.

 

२५ जानेवारी रोजी, रांगणेकर सहभागींना पुन्हा एकदा मार्गदर्शित पदयात्रेवर घेऊन जातील, या वेळी ते गोव्याच्या जैवविविधतेमध्ये फुलपाखरांचे पर्यावरणीय महत्त्व शिकवतील,  फुलपाखरांसाठी अनुकूल निवासस्थान कसे तयार करावे हे देखील या पदयात्रेत शिकवले जाणार,  हा कार्यक्रम जीएसपीसीबी प्रांगणात आयोजित केला जाईल.

 

अंतिम कार्यक्रम २७ जानेवारी रोजी चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यात होणार आहे. गोवा पक्षी संवर्धन नेटवर्कचे अध्यक्ष मंदार भगत, सहभागींना ‘फेदर्स अफ्लोट: बर्डवॉचिंग इन अ बोट’ नावाच्या बोटीतून पक्षीनिरीक्षण दौर्‍यावर त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील विविध पक्षी प्रजातींचे निरीक्षण करण्यासाठी, गोव्यातील समृद्ध अ‍ॅव्हीफौनाविषयी त्यांची समज वाढवतील.

मोहिमेच्या कार्यक्रमांच्या मालिकेतील सहभागींना नाममात्र शुल्कात क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने गोव्याच्या समृद्ध पर्यावरणाच्या महत्त्वाची सखोल माहिती मिळू शकते.

 

Date

Details

13th January 2024

Science & Storytelling in Nature’s Lab’ by Snigdha Sehgal

14th January 2024

Mangrove Walk & Nature Journaling by Khoj Aao Adventures

18th January 2024

Beekeeping Educational Workshop by Vitthal Joshi

19th January 2024

Wetland Wings: Dragonfly & Damselfly Walk by Parag Ragnekar

25th January 2024

Wings of Wonder: Butterfly Habitat & Walk by Parag Ragnekar

27th January 2024

Feathers Afloat: Bird Watching in a Boat by Mandar Bhagat

 

Trending

Exit mobile version