गोवा खबर

प्रजासत्ताक दिन सोहळा

Published

on

Spread the love

गोवा खबर: देशाच्या इतर भगाप्रमाणे गोवा राज्यात २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येणार आहे.   राज्य पातळीवरील प्रजासत्ताक दिन सोहळा  सकाळी ८.४५ वाजता ताळगांव पठारावरील गोवा विद्यापिठाच्या मैदानावर होणार आहे.

राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यावेळी राष्ट्रीय तिरंगा फडकवतील आणि मानवंदना देतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी  राज्यपालांचे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गोवा  विभागाचे ध्वजाधिकारी आणि स्टेशन कमांडर (लष्कर) त्यांचे स्वागत करतील.

#Advt Event Schedule – International Purple Fest, 2024 – January 10, 2024.
Purple Fest Goa

राज्य पातळीवरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यास  विविध शाळांतील विध्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

तसेच राज्यात जिल्हा आणि तालुका पातळीवरही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे

Trending

Exit mobile version