गोवा खबर

सर्वसमावेशकता साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा २०२४ सज्ज

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर: सोमावर (ता. ८) पासून १३ जानेवारीपर्यंत संपूर्ण आठवडाभर आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट- गोवा २०२४ चे आयोजन करण्यासाठी गोवा राज्य सज्ज झाले आहे. गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय, भारत सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा दिव्यांगजन सक्षमीकरण विभागयांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सोमवार (ता. ८) रोजी सायंकाळी ४.३० वाजता काम्पाल-पणजी येथील दयानंद बांदोडकर मैदानावर होणार आहे.

उद्घाटन समारंभासाठी मान्यवर पाहुण्यांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचेमाननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांची उपस्थिती असेल. तसेच विशेष निमंत्रितांमध्ये गोवा राज्याचे आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे, केंद्रीय पर्यटन, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईकयांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई, राज्यसभा सदस्य श्री. सदानंद तानावडे, गोवा शासनाचे मुख्य सचिव डॉ. पुनीतकुमार गोयल (आयएएस), गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसादपावसकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हझिक आणिइतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.

दिव्यांगजनांसह कलाकार मुले मनोरंजन, गायन आणि नृत्य सादरीकरणासहआपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करत उद्घाटन समारंभातून सर्वसमावेशकतेच्या या आनंदसोहळ्याचा टेम्पो निश्चित करणार आहेत.

“आपण नववर्षाचे भव्य स्वागत केले असून, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा२०२४साठी गोव्यात एक अनोखे आणि विशेष औत्सुक्याचे वातावरण आहे. या महोत्सवासाठी सर्व देशी-विदेशी प्रतिनिधींचे मोठ्या आनंदाने स्वागत करत आहे. पणजी-गोवा येथे आयोजित हा सोहळा दिव्यांगजनांसह सर्वसमावेशकता साजरा करण्याचा क्षण आहे. सर्व सहभागी प्रतिनिधींचे मनापासून स्वागत. गोव्याच्याचैतन्यमय उत्साहात आगामी आठवडा सर्वसमावेशकतेच्या आनंदाची परिपूर्ण अनुभूती लाभो, यासाठी सर्वांना शुभेच्छा,” अशी भावना समाजकल्याण मंत्री श्री.सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केली.

हाच धागा पकडत गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकरम्हणाले, “आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा २०२४ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तरदिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजामध्ये सर्वसमावेशकता आणण्यासाठी एक सामूहिक प्रयत्न आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून, आम्हीसर्वसमावेशकता, प्रवेशसुलभता आणि आपुलकीची प्रगल्भ भावना वाढवण्याचीआशा बाळगतो. हो महोत्सव आपणास उत्सवी आनंदापलीकडे घेऊन जाईल; प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी अधिक समावेशक आणि सशक्त उद्याच्या दिशेनेपरिवर्तनकारी प्रवासाची नवी सुरवात या महोत्सवातून होईल.”

उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘धमाल’ हे पर्पलगीत होय. या पर्पल फेस्टगीताचे संगीत दिग्दर्शक मन्नन शाह म्हणतात, “या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे गोव्यातील दिव्यांग व्यक्तींनी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज हस्तींच्या समवेत हे गीतगायन व सादरीकरण केले आहे. सर्वसमावेशकतेचे एक परिपूर्ण उदाहरण म्हणजेच हे महोत्सवगीत आहे.”

या महोत्सवाचे आणखी एक महत्व म्हणजे, खास दिव्यांगजनांसाठी पर्पल टीव्हीभारतचे अनावरण या महोत्सवात केले जाणार आहे. या टीव्ही चॅनेलवर दिव्यांगजनांच्या कल्पना, यशोगाथा, मुलाखती आणि जगभरातील त्यांच्या यशोगाथा सादर करत, त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक प्रसारमाध्यम व्यासपीठ उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.

इंटरनॅशनल पर्पल फेस्ट- गोवा २०२४मध्ये जगभरातून ८,०००हून अधिक अधिकप्रतिनिधी सहभागी होण्याचा अंदाज आहे. एकूणच हा महोत्सव वैविध्यता आणि सर्वसमावेशकता यांचा हा जागतिक सोहळा ठरणार आहे.

Trending

Exit mobile version