गोवा खबर

गोवा आयडीसीद्वारे सादर प्रगतीचा ध्यास झळकवणारा आधुनिक लोगो

Published

on

Spread the love
• राज्य शासनाकडून भारतीय उद्योग महासंघ (CII) च्या सहकार्याने इन्व्हेस्ट गोवा२०२४ शिखर परिषदेच्या आयोजनाची घोषणा
गोवा खबर:गोवा औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी) ने डायनॅमिक नवीन लोगोच्या अनावरणासह आपली ताजी ब्रँड ओळख सादर केली आहे. औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी, बदल स्वीकारण्यासाठी आणि गोव्याच्या औद्योगिक लँडस्केपच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी महामंडळाची कटिबद्धता या नव्या लोगोतून प्रतिबिंबित होते. आकर्षक रचना आणि वैविध्यपूर्ण घटकांच्या माध्यमातून गोवा-आयडीसीचे पुरोगामी विचार करण्याच्या दृष्टीकोनाला प्रतिबिंबित करतात व विकसित भविष्यासाठी टाकलेले धाडसी पाऊल दर्शवतात. बदलाचा स्वीकार करणे आणि शाश्वत औद्योगिक विकासाच्या मार्गावर वाटचाल करणे या दूरदर्शी वचनबद्धतेचे प्रतीक म्हणजे हा नवा लोगो आहे.
या नव्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योग मंत्री श्री. माविन गुदिन्हो, गोवा-आयडीसीचे चेअरमन श्री. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, राज्याचे प्रधान सचिव (उद्योग) व्ही. कांडवेलू, डीआयटीसीच्या संचालिका श्वेतिका साचान आणि गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रविमल अभिषेक यांच्या हस्ते आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (जीसीसीआय)चे अध्यक्ष श्री. श्रीनिवास धेम्पे, असोचेमचे चेअरमन मांगिरिष पै रायकर, जीएसआयएचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध धेम्पे, सीआयआय-गोवाचे चेअरमन श्री. अनिरुद्ध अग्रवाल, जीएसआयएचे माजी अध्यक्ष दामोदर कोचकर, सीआयआय-गोवाचे राज्यप्रमुख श्री. अंकुर परामल यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी गोवा औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी)द्वारे २९ जानेवारी २०२४ रोजी दोनापावल-पणजी येथील ताज सिदाद-दि-गोवा मध्ये इन्व्हेस्ट गोवा २०२४ या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांच्या सहकार्याने आयोजित होणाऱ्या या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट गोवा राज्यातील औद्योगिक विकास आणि सहकार्याला चालना देणे हे आहे. इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषदेमध्ये, गोवा राज्य औद्योगिक विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहन धोरण-२०२२, गोवा लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग धोरण-२०२३, गोवा इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रोत्साहन धोरण-२०२१, गोवा स्टार्ट अप धोरण यासह राज्यातील औद्योगिक विकासाशी अनुषांगिक विविध शासकीय धोरणांवर विचारमंथन होणार आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, “नवीन लोगोचे अनावरण ही गोवा-आयडीसीसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे, जो केवळ दृश्य-परिवर्तनच नव्हे तर प्रगती आणि विकासाची वचनबद्धता दर्शवतो. हरित उद्योगाच्या स्वागतावर भर देणे हे एक दूरदर्शी पाऊल असून त्याद्वारे समृद्धीसह गोमंतकीयांसठी रोजगार सुरक्षा
वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला विश्वास आहे की औद्योगिक सहभाग वाढवून आणि जागतिक भागधारकांशी रचनात्मक औद्योगिक संबंध वाढवून राज्याच्या विकासाला चालना देण्याचे काम इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषदेतून घडेल.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “इनव्हेस्ट गोवा २०२४ परिषद ही राज्याच्या उद्योग क्षेत्रातील धुरीण, उद्योजक, भागधारक यांना एकत्र येण्यासाठी आणि राज्यातील शाश्वत आर्थिक वाढीसाठी संधी शोधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करेल.”
उद्योगमंत्री श्री. माविन गुदिन्हो म्हणाले की “गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या नवीन लोगोचे अनावरण प्रगती आणि आधुनिकतेच्या दिशेने आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. हा नवीन लोगो दृश्य-प्रतिनिधित्वापेक्षा अधिक आहे. औद्योगिक नाविन्यता, विकास आणि गतिमानतेसाठी आमच्या वचनबद्धतेचे तो प्रतीक आहे. जसजसे आम्ही पुढे जात आहोत, हा नवा लोगो व्यवसायासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि गोव्याच्या उद्योगांना नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्या समर्पणाचे प्रतिनिधित्व करतो. गोवा राज्याला आघाडीचे लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग केंद्र म्हणून विकसित करण्याची आमची इच्छा आहे. धोरणात्मक उपक्रम आणि भागीदारीच्या माध्यमातून लॉजिस्टिक क्षेत्रात गोवा राज्याचे महत्व स्थापित करणे, आर्थिक वाढीला चालना देणे आणि राज्यातील संसाधनांची क्षमता वाढवणे हे उद्देश आम्ही आखले आहेत.”
राज्यात नवीन औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि राज्यात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा-आयडीसीने व्यापक उपाययोजना केली असून याचवेळेला गोवा-आयडीसीचा हा नवा लोगो सादर करण्यात आला आहे. गोव्यातील औद्योगिक विकासाच्या इतिहासातील प्रमुख भागधारक, सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी उपस्थित असलेला अनावरण सोहळा हा एक संस्मरणीय क्षण ठरला.
गोवा-आयडीसीचे चेअरमन श्री. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले, “हा नवीन लोगो गोवा-आयडीसीच्या प्रगतीशील दृष्टीचे प्रतिबिंबित करतो. आधुनिकीकरण आणि शाश्वततेकडे आमच्या वाटचालीचे ते प्रतीक आहे. गोवा-आयडीसीचे चेअरमन या मी राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींना आवाहन करतो की गोव्याच्या औद्योगिक विकासासासाठी परस्पर सहकार्य वाढवावेत. आपल्या प्रयत्नांना एकत्रित करून, आपण अधिक सक्षम आणि लवचिक औद्योगिक परिसंस्था निर्माण करू शकतो. समन्वयाची प्रमुख क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि त्या दिशेने काम करण्यासाठी एकत्र येऊ या. आपला सहभाग आणि वचनबद्धता गोव्याच्या औद्योगिक क्षेत्राची पूर्ण क्षमता साकार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”
गेल्या वर्षभरात, गोवा-आयडीसीने विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवल्या असून, याद्वारे प्रगती आणि नावीन्यतेबद्दलचे शासनाचे समर्पण दिसून येते. गोवा-आयडीसी नियमन २०२३ची अधिसूचना, जवळपास सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये २२ आयडीसी-कनेक्ट कार्यक्रमांचे आयोजन आणि डीएसएलआरसह धोरणात्मक सामंजस्य करारानंतर सर्व औद्योगिक क्षेत्रांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण पूर्ण करणे यांचा या उपाययोजनांमध्ये समावेश होतो. याव्यतिरिक्त, गोवा-आयडीसीने एकूण ५० कोटींच्या गुंतवणुकीसह पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांचा सक्रियपणे पाठपुरावा केला आहे आणि भविष्यातील कार्यक्रमांसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. डिजिटल पब्लिक गुड्सचा लाभ घेणारी देशातील पहिले औद्योगिक महामंडळ बनण्याचा मान गोवा-आयडीसीला मिळाला आहे. नवा लोगो डिजिटल युगातील आमचा प्रवास प्रतिबिंबित करतो. कार्यक्षमता, पारदर्शकता आणि तांत्रिक प्रगतीत आघाडीवर राहण्याची वचनबद्धता यावर तो भर देतो. गोवा-आयडीसी औद्योगिक वसाहतींच्या मानांकन प्रणालीचा अवलंब करण्यात गोवा-आयडीसी अग्रणी राहिले असून औद्योगिक विकासातील उच्च मानके आणि सर्वोत्तम पद्धती राखण्यासाठी आमचे समर्पण प्रदर्शित करते.

Trending

Exit mobile version